Shahrukh Khan: 'जवान'च्या रिलिज आधी शाहरुख पोहोचला तिरुपती मंदीरात; पाहा व्हिडिओ

Shahrukh Khan Viral Video: पठाण चित्रपट रिलिज आधीदेखील शाहरुख खान वैष्णो मातेच्या मंदीरात पोहचला होता.
Shahrukh Khan's Jawan
Shahrukh Khan's JawanDainik Gomantak
Published on
Updated on

Shahrukh Khan Jawan Viral Video: बॉलीवूडच्या किंग खानची अर्थात शाहरुखची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरु आहे. त्याचा बहुचर्चित आगामी चित्रपट जवान ७ सप्टेंबर २०२३ ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

शाहरुखला पून्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

मात्र आता तो चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. शाहरुख खानने आपली मुलगी सुहाना आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यासोबत आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

यावेळी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून किंग खानची चर्चा होताना दिसत आहे.

Shahrukh Khan's Jawan
Jailer Collection : जेलर काही थांबेना... आता मारली 650 कोटींची मजल

मिळालेल्या माहीतीनुसार, तिरुपतीमध्ये जाण्याआधी शाहरुख जम्मू(Jammu ) काश्मीर मध्ये वैष्णो मातेच्या दर्शनासाठी गेला होता.

पठाण चित्रपटाच्या रिलिजआधीदेखील शाहरुख खान वैष्णो मातेच्या मंदीरात पोहचला होता. आता जवान चित्रपटाच्या यशासाठी प्रमोशन पासून दर्शनापर्यंत शाहरुख सगळे प्रयत्न करताना दिसत आहे.

दरम्यान, 'जवान' हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक अॅटली यांनी केले आहे.

तो या चित्रपटाचा सहलेखकही आहे. अॅटलीचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी जवानची निर्मिती केली आहे.

चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. त्यांच्याशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रासारखे स्टार्सही आहेत.

यात सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटी सहाय्यक भूमिकेत आहेत.

Shahrukh Khan's Jawan
KBC ला मिळाला पहिला करोडपती... IAS बनण्याचं स्वप्न असलेला पंजाबचा तरुण आहे तरी कोण?

आता शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित जवान शाहरुखच्या पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com