KBC ला मिळाला पहिला करोडपती... IAS बनण्याचं स्वप्न असलेला पंजाबचा तरुण आहे तरी कोण?

कौन बनेगा करोडपतीच्या या सीजनमधला पहिला करोडपती शो ला मिळाला असुन पंजाबच्या या तरुणाचे IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे.
KBC 15
KBC 15Dainik Gomantak
Published on
Updated on

कौन बनेगा करोडपती सध्या टेलिव्हीजन विश्वातला एक सर्वात लोकप्रिय शो म्हणुन दिवसेंदिवस प्रसिद्धीस येत आहे. सोशल मिडीयावर या शोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बिग बींच्या संवाद साधण्याच्या अनोख्या शैलीमुळे प्रेक्षक आकर्षित होतातच शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्पर्धकांमुळे हा शो सर्व स्तरात पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या शोला 15 व्या सीजनचा पहिला करोडपती मिळाला आहे.

15 व्या सीजनचा पहिला करोडपती

'कौन बनेगा करोडपती 15' 2023 सीझनचा पहिला करोडपती शोला मिळाला आहे. पंजाबमधील खालदा या गावातील जसकरण सिंग याने या शोमध्ये 1 कोटी रुपये जिंकले असून बक्षिसाची रक्कम 7 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. 

अमिताभ बच्चन समोर हॉट सीटवर पोहोचलेल्या जसकरणचा हा एपिसोड सोमवार-मंगळवार (4 , 5 सप्टेंबर) टीव्हीवर प्रसारित होणार आहे. त्यानंतरच 7 कोटींच्या प्रश्नाचे काय झाले ते कळेल. पण त्याआधी जसकरणने सांगितले की, गेल्या ४ सीझनपासून तो या क्षणाची वाट पाहत होता.

जसकरण सिंह कोण आहे?

7 कोटींच्या प्रश्नासाठी पात्र झालेला जसकरण नेमका कोण आहे? चला पाहुया. 'दैनिक भास्कर'शी बोलताना 21 वर्षीय जसकरण सिंहने सांगितले की, तो यूपीएससीची तयारी करत आहे आणि आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी जसकरण कोणतंही कोचिंग किंवा मदत घेत नाही असं त्याने सांगितलं आहे. 

जसकरणने पुढे सांगितले की तो वाचनालयात तासनतास घालवतो आणि पुस्तकांच्या जगात ज्ञानाच्या महासागरात डुंबत राहतो. काही शंका असल्यास ऑनलाइन शोधतो आणि गुगलच्या मदतीने त्याच्या अभ्यासातल्या शंका दूर करतो.

चौथा प्रयत्न यशस्वी

आपल्या प्रवासाविषयी बोलताना जसकरण म्हणाला 'कौन बनेगा करोडपती 15' चा प्रवास माझ्यासाठी इतका सोपा नव्हता. तो म्हणतो, 'मी चार वेळा कौन बनेगा करोडपतीची तयारी करत होतो. पण प्रत्येक वेळी तो नाकारला जात होता. 

तरीही आशा सोडली नाही, कारण एक दिवस अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास होता. ज्या प्रश्नाचे उत्तर पुस्तकात सापडत नाही, तो मी ऑनलाइन शोधायचो आणि त्यातूनच मला यश मिळाले.

7 कोटींच्या प्रश्नाचे काय झाले?

जसकरणचा 'KBC 15' चा एपिसोड दोन आठवड्यांपूर्वी शूट झाला होता. पण सोनी टीव्हीच्या नियमांना बांधील असल्यामुळे तो कुठेही त्याबद्दल सांगत नव्हता. मात्र आता एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ रिलीज झाल्यामुळे तो या प्रवासाबद्दल सर्वांना सांगू शकतो.

 असं असलं तरी, 7 कोटींच्या प्रश्नाचे काय झाले याबाबत जसकरण अजूनही काही सांगू शकत नाही. मात्र, जसकरणच्या घरात तो करोडपती झाल्यामुळे जल्लोषाचे वातावरण आहे. अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या घरी येऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com