Shahrukh Khan On Chaiyya chaiyya song: व्हाइट हाऊस, छैय्या छेय्या अन् मोदी! चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचे हटके उत्तर

Shahrukh Khan: 25 जूनला शाहरुखने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये 31 वर्षे पूर्ण केली आहेत.
Shahrukh Khan-PM Modi
Shahrukh Khan-PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shahrukh Khan: बॉलीवूडच्या किंग खानने आपल्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तो नेहमीच वेगळया धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो.

25 जूनला शाहरुखने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये 31 वर्षे पूर्ण केली आहेत. या तीन दशकात त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले आहेत आणि अजूनही देत आहे. 1992 मध्ये शाहरुखने दीवाणा चित्रपटात ऋषी कपूर, दिव्या भारती आणि आमरिश पुरी यांच्यासोबत डेब्यू केला होते. या आनंद साजरा करण्यासाठी शाहरुख खानने ट्विटरवर आस्क एसआरके हा सेशन ठेवत आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना मजेदार उत्तर दिली आहेत.

आस्क एसआरके या सेशनदरम्यान, एका चाहत्याने किंग खानला विचारले अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये मोंदीचे स्वागत छैया छैया या गाण्याने केले गेले तेव्हा तुम्हाला कसे वाटले? त्यावर शाहरुख मोठे मजेदार उत्तर देताना दिसला आहे. मी तिथे या गाण्यावर डान्स करायला असायला हवे होते. पण मला वाटतं की त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये ट्रेनला परवानगी दिली नसती.

Shahrukh Khan-PM Modi
Kiara Advani: कियारा अडवाणी प्रेग्नेंट? व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले...

एसआरकेच्या या उत्तरावर चाहते स्मार्ट रियाक्शन असे म्हणत कमेंट करताना दिसत आहे. एका युजरने असे म्हटले आहे, तुम्ही असे आहात की प्रत्येक प्रश्नाचा इतक्या समजदारपणे उत्तर देता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडन यांनी मोदींचे जंगी स्वागत केले. त्यावेळी अमेरिकेच्या ए कैपेला ग्रुप, पेन मसालाने शाहरुखचे छैया छैया या गाण्याने मोदींचे स्वागत केले .

दरम्यान, किंग खान लवकरच जवान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखसोबत विजय सेतूपती आणि नयनतारा देखील दिसून येणार आहेत. पठाणच्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे जवान मधून शाहरुख आपली जादू कायम ठेवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
Gen Z Voters India Elections
Goa Casino Director Shooting Case
Modi government political challenge
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com