Kiara Advani: कियारा अडवाणी प्रेग्नेंट? व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले...

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यनही दिसणार आहे.
Kiara Advani
Kiara AdvaniDainik Gomantak

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यनही दिसणार आहे. दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान, कियाराचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.

बेबी बंप

अलीकडेच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर त्यादरम्यानचा फोटो शेअर केला. फोटो पाहून चाहते कियारा अडवाणी प्रेग्नंट असल्याचे सांगत आहेत.

या फोटोमध्ये कियाराचा बेबी बंप स्पष्ट दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. या फोटोमध्ये कियाराने ब्रालेट टॉपमध्ये तपकिरी रंगाचे हेवी जॅकेट कॅरी केले आहे. तर कार्तिकने पांढरा टी-शर्ट आणि निळ्या डेनिमवर जॅकेट घातले आहे.

Kiara Advani
Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding Pics: कायमचे बुकिंग झाले... कियारा-सिद्धार्थने शेअर केला लग्नाचा फोटो

या दिवशी लग्न केले

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत कियाराने लिहिले होते की- 'आता आमचे कायमचे बुकिंग पूर्ण झाले आहे...आम्ही तुमचे आशीर्वाद आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी प्रेमाची अपेक्षा करतो.'

सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'शेर शाह' चित्रपटात दिसले होते. कॅप्टन विक्रम बत्राच्या आयुष्यावरील हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास आहे, कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांमध्ये जवळीकता वाढली होती.

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

'सत्यप्रेम की कथा' हे NGE आणि नमाह पिक्चर्स द्वारे निर्मित एक म्यूजिकल ड्रामा आहे. याचे दिग्दर्शन समीर विदवान्स यांनी केले असून यात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

'सत्य प्रेम की कथा' व्यतिरिक्त कार्तिक आर्यन (Karthik Aryan) 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, कियारा 'RRR' अभिनेता राम चरणसोबत 'गेम चेंजर' या आगामी अॅक्शन ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com