Shahrukh Khan's Jawan
Shahrukh Khan's JawanDainik Gomantak

शाहरुखने रिलीजआधीच केली जादू...अमेरिकेत जवानचा रिलीजआधीच कल्ला

अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान सध्या चर्चेत आहे आता चित्रपटाचा डंका रिलीजआधीच अमेरिकेत वाजत आहे.
Published on

Shah Rukh Khan jawan updates : शाहरुख खानचा जवान सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. जवान सिनेमाचा ट्रेलर अजुन रिलीज झाला नाही तोच सिनेमाची जगभर किती चर्चा आहे, याचा अनुभव नुकताच आहे.

शाहरुख खानच्या जवानने अमेरिकेत स्वतःचा डंका मिरवलाय. शाहरुख खानच्या जवानने आजवर कोणाला जमली नाही अशी ऐतिहासीक कामगिरी केलीय. काय घडलंय बघुया...

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. आज सोमवार, २८ ऑगस्ट रोजी निर्माते 'जवान'चा ट्रेलर रिलीज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात दिसणार आहे.

करण जोहरने इंस्टाग्रामवर ट्रेलर पाहिला आणि त्याला 'शतकातुन एकदाच निर्माण होणारा ट्रेलर' असे कॅप्शन दिलंय. या सगळ्यात 'जवान'ने आगाऊ बुकिंग करून इतिहास रचला आहे. अमेरिकेत, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी $225K म्हणजेच 1.85 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे.

अमेरिकेतील आगाऊ बुकिंगचे हे आकडे 'पठाण' पेक्षाही चांगले आहेत. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाचे जगभरात 1050.05 कोटी रुपयांचे कलेक्शन होते. अशा स्थितीत 'जवान' हा आकडाही सहज पार करेल, असा अंदाज आहे.

भारतात या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही, मात्र अमेरिकेपासून भारतापर्यंत सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरसाठी असलेली लोकांची उत्सुकता पाहून चाहते जवान सुपरहिट करतील यात शंका नाही.

Shahrukh Khan's Jawan
Janhavi Kapoor : जान्हवी कपूरला राजकुमार मिळाला होता?...लपुन छपुन भेटी आणि त्याचीच ओढ ;पण अखेर

नॉट रमैय्या वस्तावैय्या

जवान सिनेमाचं नॉट रमय्या वस्तामैया या नवीन गाण्याच्या टीझरमध्ये शाहरुख खान जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. संपूर्ण काळ्या कपड्यांमध्ये किंग खान अधिकच हँडसम दिसतोय.

टीझरमध्ये जे बोल ऐकायला मिळत आहेत त्यात शाहरुखच्या प्रसिद्ध छैया, छैया या गाण्याचा उल्लेखही आहे. या गाण्यानं नुकतेच २५ वर्षे पूर्ण केली. त्याचबरोबर 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. यानंतर आता हे नवं गाण देखील प्रेक्षकांसाठी खास ठरेल.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com