Shah Rukh - Gauri Khan
Shah Rukh - Gauri KhanDainik Gomantak

Shahrukh Khan Viral Video : अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख - गौरीचे ठुमके, व्हिडीओ व्हायरल

अनन्या पांडेच्या चुलत बहिणीच्या लग्नाची सध्या सर्वत्र सुूरू आहे.
Published on

 अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे सध्या तिच्या लग्नासाठी खूप चर्चेत आहे. अलानाने गुरुवारी, 16 मार्च 2023 रोजी तिचा परदेशी प्रियकर इव्होर मॅकक्रेसोबत सात फेऱ्या मारल्या. या लग्नाला इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. 

इंटरनेटवर लग्नानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान, एकावेळी एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

अलाना पांडेच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अलानाची आई शाहरुख आणि गौरीला डान्ससाठी आमंत्रित केले आहे. 

 यादरम्यान शाहरुख खानने काळ्या रंगाची कोट पँट घातली होती. तर गौरी हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे. दोघेही डान्सचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Shah Rukh - Gauri Khan
Manoj Bajpayee :"मी 6 महिन्यांनी परत आलो तेव्हा माझ्या खोलीत 10 जण झोपले होते"! मनोज वाजपेयींनी सांगितला किस्सा...

अलीकडे, सुहाना खानने अलाना पांडेच्या संगीत समारंभात अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली चांदीची सिक्वेन्स साडी परिधान केली होती. यासोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला होता. 

या साडीसह, सुहानाने तिच्या लूकला कमीत कमी अॅक्सेसरीज, ओवी मेकअप आणि फ्री हेअर घातले होते. सुहाना खानने या साडीसोबत हाय हिल्स घातले होते. अलाना पांडेच्या संगीत सेरेमनीमध्ये सुहाना खानने परिधान केलेली साडी तिची आई गौरी खानची होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com