Shahid Rafi at IFFI Goa:"पहिलावहिला चरित्रपट बनवून रफी साहेबांना आदरांजली वाहणार, वडिलांच्या आठवणींमुळे शाहिद रफी भावुक

IFFI Goa 2024: रफी साहेबांचं जीवन हे बऱ्यापैकी राखीव होतं आणि म्हणूनच एवढे प्रख्यात गायक असून देखील मागच्या अनेक वर्षांमध्ये मोहम्मद रफी यांचा जीवनपट उलघडून दाखवणारा चित्रपट बनला नाही.
IFFI Goa 2024: रफी साहेबांचं जीवन हे बऱ्यापैकी राखीव होतं आणि म्हणूनच एवढे प्रख्यात गायक असून देखील मागच्या अनेक वर्षांमध्ये मोहम्मद रफी यांचा जीवनपट उलघडून दाखवणारा चित्रपट बनला नाही.
IFF Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Rafi Remembrance Programme at IFFI Goa

पणजी: प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘आसमान से आया फरिश्ता: मोहम्मद रफी - द किंग ऑफ मेलडी’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी त्यांची अनेक सरस गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि यावेळीच मोहम्मद रफी यांच्या मुलाने म्हणजेच शाहिद रफी यांनी लवकरच मोहम्मद रफी यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. ओ माय गॉडचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

सुरेल गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुभाष घाई आणि सोनू निगाम देखील बोलत होते, सुभाष घाई म्हणाले की मोहम्मद रफी यांच्या जीवनाबद्दल अद्याप कोणाला माहिती मिळाली नव्हती.

IFFI Goa 2024: रफी साहेबांचं जीवन हे बऱ्यापैकी राखीव होतं आणि म्हणूनच एवढे प्रख्यात गायक असून देखील मागच्या अनेक वर्षांमध्ये मोहम्मद रफी यांचा जीवनपट उलघडून दाखवणारा चित्रपट बनला नाही.
Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

रफी साहेबांचं जीवन हे बऱ्यापैकी राखीव होतं आणि म्हणूनच एवढे प्रख्यात गायक असून देखील मागच्या अनेक वर्षांमध्ये मोहम्मद रफी यांचा जीवनपट उलघडून दाखवणारा चित्रपट बनला नाही.

वडील मोहम्मद रफी आम्हाला नेहमीच त्यांच्या कामाबद्दल सांगायचे मात्र त्यांनी कधीच ते किती यशस्वी आहेत किंवा प्रसिद्ध आहेत हे आम्हाला समजू दिलं नाही. "आज मी अमिताभ बच्चनसाठी गायलो" हे ऐकल्यानंतर आम्ही त्यांना "अमिताभ किती उंच आहे?" असा प्रश्न विचारायचो असं म्हणत शाहिद रफी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील रफी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मोहम्मद रफी यांच्यासोबत मला ३५ गाणी गायला मिळाली हे माझं भाग्यचं आहे असं भावुक मत त्यांनी व्यक्त केलं.

सोबतच त्यांनी रफी साहेबांचा कार्यक्रम चुकल्याने आलेल्या हजारो प्रेक्षांबद्दलचा किस्सा सांगितला, त्या म्हणाल्या की तिकिट्स संपल्यामुळे मोहम्मद रफींच्या कार्यक्रमाला काही रसिक उपस्थित राहू शकले नव्हते आणि म्हणून त्यांनी विमानतळाबाहेर रंग लावली आणि केवळ त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून रफी साहेब मायक्रोफोन घेऊन विनाताळावर गायले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com