
पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमिताने सादर होणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये सध्या दक्षिणी चित्रपट आणि दक्षिणी कलाकार प्रसिद्धी मिळवत आहेत. गेल्या काही महिन्यात दक्षिण चित्रपट सृष्टीमधून नाव मिळवलेला सिनेमा म्हणजेच मंजुम्मेल बॉईजने चित्रपट महोत्सवात चाहत्यांची मनं जिंकली. या चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम यांनी दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना एकूण हा चित्रपट कसा घडला याची माहिती दिली.
हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधिरीत असल्याचं सांगितलं जातं. केरळमध्ये मंजुम्मेल नावाचं एक गाव आहे आणि ११ मित्रांबद्दल ही गोष्ट आहे. हे मित्र एक दिवशी कोडाईकनल मधल्या गुणा नावाच्या गुहेला भेट देतात, ही गुणा काही गुहा साधीसुधी नसते तर या गुहेत एका भयंकर शक्तीचा निवास असल्याच्या चर्चा केल्या जायच्या.
११ मित्रांपैकी एक मित्र या गुन्हेत पडतो, पोलीस किंवा कोणालाही त्याला वाचवण्यात यश मिळत नसतं मात्र एवढ्यात सिजू डेव्हिड नावाचा एक मित्र समोर येतो आणि मैत्रीच्या जोरावर गुहेत उडी घेतो. मैत्रीचं नातं किती घट्ट असू शकतं किंवा मैत्री कशी असावी यावर एकूणच गोष्ट अवलंबून असल्याने तरुण पिढीने हा सिनेमा उचलून धरला होता.
मंजुम्मेल बॉईज बद्दल सांगताना दिग्दर्शक चिदंबरम सांगतात की काही वर्षांपूर्वी हीच गोष्ट घेऊन अनेकांनी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणालाही यात यश मिळालं नाही. या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण गुहा आहे आणि चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खऱ्या गुन्हेत जाऊन चित्रीकरण करणं शक्य नसल्याने कोचीमधल्या एका गोदामात आम्ही गुहा तयार केल्याचं चिदंबरम यांनी सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.