Pathan Controversy: शाहरुखची चामडी सोलुन त्याला जिवंत जाळणार‍ ! 'संत परमहंस' यांची खुलेआम धमकी..

शाहरुख खानला संत परमहंस यांनी चामडी सोलुन जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

शाहरुख खानचा( Shah Rukh Khan) आगामी 'पठाण' वर होणारे वाद काही थांबण्याचे नाव घेईनात कारण या वादात आता अयोध्येच्या एका संताने उडी घेतली आहे. अयोध्येचे संत परमहंस यांनी अभिनेता शाहरुख खानला चामडी सोलुन जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे.

शाहरुखला अशी भयंकर शिक्षा देण्याचा विचार बोलुन दाखवताना त्यांनी अमिर खान, सलमान यांच्या बाबतीतही वादग्रस्त विधान केले आहे. शाहरुखचा आगामी पठाण चांगलाच वादग्रस्त ठरला असुन चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन गेल्या काही दिवसांत देशभरात या विरोधात वातावरण पेटले आहे. बेशरम रंग या गाण्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे.

हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे ; कारण या वादात थेट अयोध्येच्या संताने उडी घेतली आहे. संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी शाहरुख खानला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. हा चित्रपट जिहाद असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

पठाण चित्रपटाला विरोध व्यक्त करण्यासाठी संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी चित्रपटाचे पोस्टर जाळुन निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी शाहरुख मिळाला तर त्या जिहादीची चामडी सोलुन त्याला जिवंत जाळणार असे म्हटले आहे.

Shah Rukh Khan
Happy Birthday Govinda : गोविंदाच्या वडिलांनी जन्मावेळी त्याला का जवळही घेतलं नव्हतं ?

संत जगतगुरु परमहंस आचार्य यांचं वक्तव्य असलेला हा व्हिडीओ व्हायरल केला असुन त्यात त्यांनी शाहरुखसोबत सलमान खान आणि अमिर खान यांनाही मारणार असल्याचे या व्हिडीओत जाहीर केले आहे.

संत जगतगुरु परमहंस आचार्य म्हणाले कि, मुंबईत माझी माणसं या तिघांचा शोध घेत आहेत. ज्या दिवशी ते मिळतील त्या दिवशी माझे सनातनी सिंह त्यांना जिवंत जाळतील. शाहरुख, आ आमिर आणि सलमान या तिघांना मारणाऱ्यांच्या कुटूबियांना आर्थिक मदतही केली जाणार असल्याचं संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com