समंथा रुथ प्रभू ची मुख्य भूमीका असलेला शाकुंतलमने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ₹ 3 कोटी कमावले आहेत .
गुणशेखर दिग्दर्शित या चित्रपटात देव मोहन यांचीही भूमिका आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत थिएटरमध्ये दाखल झाला.
शाकुंतलम हा तेलगू चित्रपट, कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या लोकप्रिय भारतीय क्लासिक नाटकावर आधारित आहे. एक लहरी कथा म्हणुन ओळखले जाणारे, शकुंतलम देव यांनी साकारलेली शकुंतला (समंथा) आणि राजा दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेभोवती फिरते.
राजा दुष्यंत शकुंतलाला जंगलात शिकारीच्या प्रवासाला निघाला असताना त्याला भेटतो. ते प्रेमात पडतात आणि गंधर्व पद्धतीनुसार लग्न करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतलमने ' सर्व भाषांसाठी पहिल्याच दिवशी ₹ 3 कोटींची कमाई केली'. चित्रपटाने तेलगूमध्ये ₹ 2.43 कोटी, हिंदीमध्ये ₹ 0.4 कोटी, तमिळमध्ये ₹ 0.15 कोटी आणि मल्याळममध्ये ₹ 0.02 कोटी कमावले.
शनिवारी राधाकृष्ण एन्टरटेन्मेंट्सने ट्विटरवर चित्रपटाविषयी अपडेट शेअर केले. यात ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये चित्रपटाच्या कमाईविषयी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
अलीकडेच शकुंतलमबद्दल बोलत असताना, सामंथा एका मुलाखतीत म्हणाली, "ही एक प्रेमकथा आहे. आणि प्रेम हे स्वतःमध्येच एका विश्वासारखे आहे. आमचा सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे.
या चित्रपटाची कथा आमच्या सर्वात जुन्या क्लासिक्सपासुन प्रेरित आहे. याशिवाय चित्रपटाची कथा, ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स हे महत्त्वाचे घटक आहेत. मी उत्साही आहे आणि थोडी नर्व्हसही आहे. चित्रपटाचे बजेट खूप जास्त आहे. पण मला वाटते की प्रेक्षकांना चित्रपट आवडेल".
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.