'कौन बनेगा करोडपति 13' चे Schedule जाहीर

केबीसी (KBC) आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Instagram/@amitabhbachchan

टीव्हीवरील (TV) प्रसिद्ध रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपति' (Kaun Banega Crorepati) च्या प्रत्येक नवीन सीजनची (New Season) चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पुन्हा एकदा कौन बनेगा करोडपति (Kaun Banega Crorepati) टीव्हीवर (TV) येण्यास सज्ज झाला आहे. आता केबीसीच्या 13 व्या सीजनची प्रतीक्षा संपली आहे. या शोची ऑडिशन (Audition) फेरी पूर्ण झाली असून, शोच्या निर्मात्यांनी त्याचे वेळापत्रक (Schedule) जाहीर केले आहे.

नेहमीप्रमाणेच या सीजनचे देखील महानायक अमिताभ बच्चन होस्ट करतांना दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या होस्टिंगमुळे 'कौन बनेगा करोडपति' हा शो नेहमीच आकर्षक बनतो.

Amitabh Bachchan
नीरज चोप्रा बॉलिवूडमधील 'या' कलाकारांचा आहे खूप मोठा फॅन

'कौन बनेगा करोडपती' कधी सुरू होणार

चाहत्यांचा आवडता शो 'कौन बनेगा करोडपति 13' (KBC) या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. केबीसी 23 ऑगस्ट 2021 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. सोनी टीव्हीने ट्विट करून माहिती शेअर केली आहे. मागील सीजनप्रमाणेच या वर्षीही केबीसी आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजने सोशल मिडियावर प्रोमो शेअर करून पूर्ण वेळापत्रक शेअर केले आहे.

Amitabh Bachchan
प्रियंका, कतरिना आणि आलिया रोड ट्रीपच्या माध्यमातून करणार 'जी ले जरा' चा प्रवास

शोचे प्रोमो यावेळी वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. यंदा प्रोमोमध्ये एक कथा सादर करण्यात आली आहे. यामुळे शो टेलिकास्ट होण्यापूर्वीच,ते प्रोमोद्वारे प्रसिद्ध झाले आहे. केबीसी 23 तारखेपासून सुरू होणार असल्याने चाहत्यामध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

कौन बनेगा करोडपति हा एक क्विजवर आधारित शो आहे, या शोमध्ये देशाच्या विविध भागातील स्पर्धकांची निवड त्यांच्या ज्ञानाच्या आधारे केली जाते. त्यानंतर हे स्पर्धक हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा क्विजवर आधारित खेळ खेळतात. या शोमध्ये,अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सर्व योग्य प्रश्नांची उत्तरे दिल्याने स्पर्धक 7 कोटीपर्यंत जिंकू शकतात. मागील सीजनमध्ये चार लोक करोडपति बनले होते. कौन बनेगा करोडपति या शोमुळे शेकडो लोकांचे स्वप्ने पूर्ण केली आहेत. याच कारणांमुळे या शोची दरवर्षी आतुरतेने वाट पाहली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com