Scam 2003
Scam 2003 Dainik Gomantak

Scam 2003 : तेलगीच्या घोटाळ्याची गोष्ट नेमकी आहे तरी काय? चला पाहुया स्कॅम 2003...

भारतातल्या गाजलेल्या घोट्याळ्यापैकी एक म्हणजे तेलगीने केलेला स्टँम्पचा स्कॅम...2003 साली झालेल्या या घोटाळ्याची चर्चा एका वेब सिरीजमुळे होतेय...

Scam 2003 : भारतातल्या चर्चित आणि गाजलेल्या घोटाळ्यापैकी एक म्हणजे तेलगीने केलेला स्टँम्प अर्थात मुद्रांक घोटाळा.

2003 साली झालेल्या या आर्थिक घोटाळ्याने देशाचं लक्ष वेधलं गेलं, या घोटाळ्याची पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे या विषयावर आता 'सोनी लिव'वर 2 सप्टेंबरपासून रिलीज व्हायला सज्ज झालेली एक वेब सिरीज.

स्कॅम 2003 या नावाच्या या वेबसिरीजने या घोटाळ्याची गोष्ट प्रेक्षकांंसमोर ठेवली आहे. चला पाहुया हा घोटाळा आणि त्याची ओटीटीवर मांडलेली गोष्ट

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित, स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी 2 सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होण्यासाठी सज्ज आहे. थिएटर आर्टिस्ट यात गगन देव रियार यांनी यात तेलगीची मुख्य भूमीका साकारली आहे. 

द तेलगी स्टोरी हा हंसल मेहता यांच्या 2020 साली हिट स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरीचा फॉलोअप आहे . स्कॅम 2003 अब्दुल करीम तेलगीच्या 2003 च्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कथा सांगते.

30 हजार कोटींच्या बनावट स्टँम्पची गोष्ट

स्कॅम 2003 मध्ये अब्दुल करीम तेलगीच्या उदयाचा मागोवा घेण्यात आला. जेव्हा हा घोटाळा 2003 साली उघड झाला तेव्हा तेलगीला अटक करण्यात आली तेव्हा तब्बल 30,000 कोटी रुपयांचे बनावट स्टॅम्प पेपर रॅकेट चालवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

तेलगीला 2006 मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याला 30 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा घोटाळा भारतातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानला जातो.

स्कॅम 2003 1 सप्टेंबर रोजी सोनी LIV वर प्रीमियर रिलीज झाला आहे. यात तेलगीची भूमिका साकारणारे अभिनेते गगन देव रियार एक दिग्गज थिएटर आर्टिस्ट आहेत.

रियार 2003 च्या घोटाळ्यात भारतीय रंगभूमीवर मोठ्या प्रमाणावर काम करत होते. गेल्या 15 वर्षांपासून ते भारतीय रंगभूमीवर कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत.

पत्रकार संजय सिंह यांनी घोटाळा उघड केला होता

30,000 कोटी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामागे अब्दुल करीम तेलगीचा हात असल्याची गोष्ट या शोमध्ये सांगण्यात आली आहे. हा शो तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला आहे. पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या हिंदी पुस्तकातून ते रूपांतरित करण्यात आले आहे, ज्यांनी या घोटाळ्याचा छडा लावला होता.

Scam 2003 चे कलाकार

स्कॅम 2003 मध्ये भरत जाधव, शाद रंधावा, सना अमीन शेख आणि मुकेश तिवारी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. भारतातल्या एका मोठ्या घोटाळ्याची गोष्ट ऐकण्यासाठी आता प्रेक्षक सज्ज झाले आहेत.

आता या शोला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com