सत्‍यजीत रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेत उतरायचे

सत्यजीत रे (Satyajit Ray) यांनी आधुनिक चित्रपट सृष्टीचा पाया रचला असे मानले जाते.
Satyajit Ray used to come down from the lens of the camera into the mood of personality
Satyajit Ray used to come down from the lens of the camera into the mood of personalityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सत्यजीत रे (Satyajit Ray) यांनी आधुनिक चित्रपट सृष्टीचा पाया रचला असे मानले जाते. जगभरातील चित्रपट रसिकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे. आपल्‍या कॅमेराच्या लेन्समधून ते थेट त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेत प्रवेश करत असत; त्यातूनच त्यांना त्यांच्या चित्रपटातून जिवंत व्यक्तिरेखा साकारता आल्या, असं मत एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चित्रपट संकलन विभागाचे साहाय्‍यक प्रोफेसर ए. व्ही. नारायणन यांनी व्यक्त केले. मास्टर क्लासमध्ये ते बोलत होते.

सत्यजित रे यांच्या दिग्दर्शन कौशल्याबद्दल बोलताना नारायणन म्हणाले, त्यांच्यासाठी कॅमेरा लेन्सेस आणि त्या भिंगाचा विस्तार समजून घेणे अत्यंत महत्वाचे होते. आधुनिक सिनेमाचे जनक मानले जाणाऱ्या रे यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात स्टोरीबोर्डिंग म्हणजे एकापाठोपाठ एक चित्र अनुक्रमे मांडून चलचित्र आधी दृश्य स्वरूपात समजून घेण्याचा प्रयोग केला. ब्रेक डाऊन म्हणजेच चित्रपटातील तांत्रिक बाबींचा अनुक्रमे तक्ता तयार केला. त्यांच्या या पूर्वतयारीमुळे नंतरचे संकलन अगदी सोपे होत असे. कथा सांगण्याच्या प्रक्रियेतच ते संकलनाची अत्यंत सुरेख, सहज गुंफण करत असे नारायणन यांनी सांगितले. चित्रपटाचा प्रकार त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता तर कायम आशय महत्त्वाचा असे.

Satyajit Ray used to come down from the lens of the camera into the mood of personality
'संजीव कुमार' यांचा अभिनयातील प्रवास..

सत्‍यजीत रे यांचे मास्टरपीस चित्रपट ‘अपूर संसार’ आणि ‘चारुलता’मधील काही दृश्ये दाखवत त्‍यांनी केलेले विविध प्रकार आणि शैलीचे प्रयोग तसेच अत्यंत वेगळ्या व्यक्तिरेखांची मांडणी नारायणन यांनी समजावून सांगितली. चित्रपटातील महत्त्‍वाचा भाग संगीताच्या माध्यमातून ते अधिक प्रत्ययकारी कसा करत हेही त्यांनी सांगितले.

अत्यंत अल्प स्वरूपात भाव-भावना दाखवण्याच्या शैलीवर रे यांचा विश्वास होता. त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनातील आंदोलने, त्यांचे अंतर्गत संघर्ष रे यांनी पडद्यावर अप्रतिम साकारले आहेत. ते त्यांच्या व्यक्तिरेखांच्या थेट मनोभूमिकेत शिरत असत. एवढेच नाही तर प्रेक्षकांना देखील ही मनोभूमिका समजून घेण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी करुन घेत, असेही ते म्‍हणाले.

‘सत्यजीत रे जीवनगौरव’ पुरस्‍कार प्रदान

सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या दिग्गज, असामान्य चित्रपट निर्मात्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्र सरकारने वर्षभर देशात आणि विदेशातही कार्यक्रम आयोजित केले आहेत. सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत आणि सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यानिमित्ताने, इफ्‍फीतील जीवनगौरव पुरस्काराला ‘सत्यजीत रे जीवनगौरव’ पुरस्कार असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा, म्हणजेच 52व्या इफ्‍फीत अमेरिकन चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान सोबो यांना 20 नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com