सत्यजित रे... एक असं नाव जे भारतीय सिनेमाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणता येईल. आपल्या चित्रपटातुन मन हेलावून टाकणारी सत्यस्थिती दाखवणारे दिग्दर्शक म्हणजे सत्यजित रे. आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्य पाहुया सत्यजित रे यांचा एक किस्सा जो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी संबधित आहे. आपल्या चित्रपटांमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या गरीब भारताचे असे चित्र दाखवले की संसदेतही त्यांच्या विरोधात चर्चा झाली.
एकदा पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना त्यांचे वडील पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मी राजकीय चित्रपट बनवत नाही. असे असूनही इंदिरा गांधी त्यांच्या मोठ्या चाहत्या राहिल्या. जरी चित्रपट अभिनेत्री आणि खासदार नर्गिस दत्त यांना सत्यजित रे यांचे चित्रपट कधीच आवडले नाहीत.
नर्गिस यांनी संसदेत चर्चेदरम्यान म्हटले होते की, रे यांच्या चित्रपटांमुळे जगात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. यामध्ये केवळ गरिबी दाखवण्यात आली आहे. त्यावर इंदिरा गांधींनी त्यांना आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले.
इंदिरा गांधींनी नर्गिस यांना आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते, कारण त्यांना सत्यजित रे यांच्या कार्याबद्दल खूप आदर होता. त्यांनी एकदा सत्यजित रे यांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या योगदानावर डॉक्युमेंटरी बनवण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. राजकीय मुद्द्यांवर चित्रपट बनवू शकत नाही, असे ते म्हणाले.
अनेक हिट चित्रपट दिल्यानंतरही सत्यजित रे पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना विश्वास होता की पैशाची बचत करून, ते पुस्तके खरेदी करू शकतील आणि चित्रपट पाहू शकतील, ज्यामुळे त्यांना उत्तम चित्रपट बनविण्यात मदत होईल.
सत्यजित रे यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांचा एकही चित्रपट ऑस्करसाठी पाठवला गेला नाही. असे असूनही, 1992 मध्ये त्यांना ऑस्करचा जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा झाली.
सत्यजित रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 36 चित्रपट दिग्दर्शित केले, त्यापैकी 29 फीचर फिल्म, 5 डॉक्यूमेंट्री आणि 2 लघुपट होते. या चित्रपटांसाठी त्यांना 32 पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील चारही सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.