Satish Kaushik Suspicious Death: सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला वळण ...गुप्त पार्टी, बिल्डर आणि संशयास्पद औषधं...

अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळंच मिळालं आहे
Satish Kaushik Suspicious Death
Satish Kaushik Suspicious DeathDainik Gomantak
Published on
Updated on

सतीश कौशिक यांचा दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला यानंतर संपूर्ण देशभर दु:खाची लाट पसरली पण आता या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या राजधानीत झालेल्या मृत्यूबाबत आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत . त्यानंतर सतीश कौशिक यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना होळी पार्टीच्या बहाण्याने एका मोठा बिल्डर आणि गुटखा कंपनीच्या मालकाने दिल्लीला बोलावले होते. 

राजोकरीतील वेस्ट एंड कॉलनी येथील एका आलिशान फार्म हाऊसमध्ये गुप्त पद्धतीने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथून काही आक्षेपार्ह औषधेही जप्त करण्यात आली आहेत. तो कोण होता आणि त्यात कोण कोण सहभागी झाले होते, याचा शोध घेतला जात आहे.

ही ओषधे नेमकी कसली आहेत आणि त्याचा सतीश कौशिक यांच्यावर नेमका काय परिणाम झाला याचा तपास आता पोलिस करत आहेत

मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे आणि पोलिसांच्या एका पथकाने पार्टी आयोजित केलेल्या फार्म हाऊसलाही भेट दिली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पोलिसांनी फार्म हाऊसमधून काही औषधे जप्त केली आहेत.

त्याच वेळी, पोलिसांनी सांगितले की एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीची छाननी केली जात आहे. या पार्टीच्या आयोजनात एका उद्योगपतीचाही हात आहे जो एका प्रकरणात फरार आहे.

Satish Kaushik Suspicious Death
Natu Natu in Oscars 2023: RRR च्या 'Natu Natu'ला अंतिम नामांकन , भारताला यंदा ऑस्कर मिळणार?

सतीश कौशिक यांना होळीच्या रात्री उशिरा अचानक छातीत दुखू लागलं, तेव्हा त्यांना फार्म हाऊसवरून गुरुग्रामला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच विकास भूमिगत झाला आणि दुसऱ्या दिवशी दुबईला पळून गेला. 

त्यांनी हे प्रकरण निकाली काढण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरवर सोपवली. बिल्डरने रात्री विशेष आयुक्तांना बोलावून संपूर्ण घटनेची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com