Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडवर शोककळा, सेलिब्रेटींनी सोशल मीडियातून वाहिली श्रद्धांजली

सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
Satish kaushik Passed Away
Satish kaushik Passed AwayDainik Gomantak

Satish Kaushik Passed Away: प्रसिद्ध अभिनेते, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक  सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • अनुपम खेर

मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे कधी लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य अजिबात सारखे नसेल! ओम शांती. असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी केले आहे.

Satish kaushik Passed Away
Satish Kaushik यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका गाजवल्या
  • कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरवर सतीश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिलं, 'सकाळी उठल्यावर ही धक्कादायक बातमी कळाली.  सतीश  हे खूप चांगले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आम्हाला त्यांची आठवण येईल. ओम शांती.'

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ट्वीट करत लिहिले की, ‘परिपूर्ण कॉमिक टायमिंग असलेला एक अद्भुत अभिनेता, एक अप्रतिम दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे एक नामांकित माजी विद्यार्थी. सतीश कौशिकजी तुम्ही फार लवकर आम्हाला सोडून गेलात..’

अभिनेता रणदीप हुडा याने म्हटले की, ‘तुम्ही आमच्या बालपणापासून आमच्या आयुष्याचा एक भाग आहात.. या मनोरंजनासाठी धन्यवाद सतीशजी.. ओम शांती’

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.

चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना 1987 च्या मिस्टर इंडिया चित्रपटाच्या कॅलेंडरमधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

सतीश कौशिक यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1985 मध्ये तिने शशी कौशिकसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचे वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झाले.

दिग्दर्शक म्हणून सतीश कौशिक यांनी जहाँ रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बढाई, तेरे नाम, क्यूंकी, ढोल, कागज यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com