Satish Kaushik यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका गाजवल्या

सतीश कौशिक यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या होत्या.
Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak

Satish Kaushik Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज निधन झाले. त्यांचा निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून देखील त्यांनी अनेक दमदार चित्रपट दिले. पण अभिनेता म्हणून ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. यातील काही पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

सतीश कौशिक नेहमीच सहाय्यक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. कधी त्यांनी चित्रपटात खलनायकाची भुमिका तर कधी तर कधी एखादं खळखळवून हसवणारी भुमिका साकरली आहे.


मिस्टर इंडिया- कॅलेंडर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात (Movie) सतीश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती.

Satish Kaushik
Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
  • साजन चले ससुराल- मुथू स्वामी

गोविंदा, तब्बू आणि करिश्मा कपूर यांचा ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट १९९६मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘मुथू स्वामी’ हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी आपल्या विनोदाने सगळ्यांना भरपूर हसवले.

  • स्वर्ग

'स्वर्ग' या चित्रपटामध्येही त्यांनी अतिशय अप्रतिम भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते गोविंदासोबत सहाय्यक भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्सही खूप हिट झाले होते.

  • देख तमाशा देख- मुथा शेठ

'देख तमाशा देख' या चित्रपटात सतीश कौशिक मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात सतीश ‘मुथाशेठ’ च्या भूमिकेत झळकले होते. 'देख तमाशा देख' हा चित्रपट राजकारण आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींवर भाष्य करणारा होता.

  • मिस्टर अँड मिसेस खिलाडी- ज्योतिषी

सतीश कौशिक यांनी अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’मध्ये ज्योतिषाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये ते अक्षय कुमारचे मामा बनले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com