बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची ओळख करून देणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिचा नवरा आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनास आनंदात आयुष्य जगताना दिसून येतात आणि नुकतेच प्रियांका आणि निक देखील पालक झाले आहेत. प्रत्येक बाबतीत आपलं मत मांडणाऱ्या प्रियंका चोप्राने रशिया आणि युक्रेन युद्धावरून लहान मुलांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Priyanka Chopra emotional post for children during the Russia Ukraine war)
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते. बिझी शेड्यूल मध्ये असूनही प्रियंका अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे विचार किंवा फोटो-व्हिडिओ यांच्या माध्यमातून अपडेट करत असते. दरम्यान, 100 दिवसांच्या रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धात अडकलेल्या मुलांसाठी प्रियंका चोप्रा खूपच चिंतेत दिसली.
प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये पीसीने लिहिले आहे की मृत्यूचे 100 दिवस आणि त्याच्या 100 वेदना, 100 दिवस भीती, 100 दिवस युद्ध. अशाप्रकारे प्रियंका चोप्राने आपला मुद्दा ठेवत सांगितले की, या दुसऱ्या महायुद्धात बालसंरक्षणाचे संकट वाढताना दिसून येत आहे. यासोबतच प्रियांकाने युनिसेफच्या विचारात आपले मत मांडताना लिहिले आहे की, कौटुंबिक संघर्ष आणि कोविड-19 (Covid 19) च्या भीतीमध्ये मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत रहायला हवे आणि मुलांना आधार देण्यासाठी युनिसेफ हेच करत आहे.
रशिया-युक्रेन युद्धावर प्रियंका चोप्राने आपले मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी या युद्धाच्या 25 व्या दिवशी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्या व्हिडीओमध्ये युक्रेनमधून स्थलांतरित झालेले लोक दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने एक लांब आणि रुंद नोटही लिहिली आहे. ज्या अंतर्गत प्रियांका या युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे स्पष्टपणे वर्णन करताना दिसून येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.