VIDEO: ''मी अजूनही व्हर्जिन आहे बेबी''; 'बिग बॉस ओटीटी 3' ची विजेती सना मकबूलच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ

Sana Makbul Virginity Reveal Interview: 'बिग बॉस ओटीटी 3' ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या एका खळबळजनक विधानामुळे चर्चेत आली.
Sana Makbul Virginity Reveal Interview
Sana Makbul Dainik Gomantak
Published on
Updated on

Sana Makbul Virginity Reveal Interview: 'बिग बॉस ओटीटी 3' ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या एका खळबळजनक विधानामुळे चर्चेत आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केला, जो ऐकून तिचे चाहते आणि नेटकरी अवाक झाले. सनाने अत्यंत मोकळेपणाने आणि उघडपणे सांगितले की, "मी अजूनही व्हर्जिन आहे बेबी… खरंच!" तिचे हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

32 वर्षांच्या सना मकबूलने या मुलाखतीत स्पष्ट केले की, ती आजपर्यंत कधीही कोणासोबतही फिजिकल रिलेशनशिपमध्ये आलेली नाही. इतकेच नव्हे तर तिने आजवर कोणाला साधे 'किस' देखील केलेले नाही. ती हुकअप संस्कृती आणि अशा तात्पुरत्या संबंधांपासून नेहमीच दूर राहिली. जेव्हा तिची ही जीवनशैली (Lifestyle) तिच्या धर्मामुळे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने हा आपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले. यामागील मुख्य कारण सांगताना ती म्हणाली की, आजकाल लोक खूप सहजपणे मन दुखावतात आणि हृदय तोडतात, म्हणूनच तिला प्रेमात पडण्याची भीती वाटते.

Sana Makbul Virginity Reveal Interview
Salman Khan Matrubhoomi: दबंग सलमान खान पुन्हा अडचणीत, बहुचर्चित 'मातृभूमी' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; 'हे' कारण आले समोर

सनाच्या मते, आजच्या काळात कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवणे अत्यंत कठीण झाले आहे. एकदा विश्वासघात झाला किंवा मन तुटले की माणसाचा समोरच्या व्यक्तीवरचा विश्वास उडून जातो. तिने तिच्या भूतकाळातील एका नात्याचा उल्लेख करत सांगितले की, जेव्हा तिला तिच्या करिअरमध्ये यश मिळू लागले, तेव्हा तिच्या पार्टनरला त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला होता. या कडू अनुभवांमुळेच तिने रिलेशनशिपपासून लांब राहणे पसंत केले.

Sana Makbul Virginity Reveal Interview
Salman Khan Net Worth: गॅलेक्सी अपार्टमेंट, ऑडी-मर्सिडीज आणि बरंच काही... बॉलीवूडच्या 'भाईजान'ची एकूण संपत्ती किती? आकडे पाहून व्हाल हैराण

आपल्या लाडक्या अभिनेत्रीने केलेल्या या धाडसी खुलाशामुळे तिचे चाहते प्रचंड चक्रावून गेले आहेत. अगदी मुलाखत घेणाऱ्या निवेदकालाही सनाच्या या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जात होते. सोशल मीडियावर यावरुन आता दोन गट पडले असून काहींच्या मते हा केवळ आगामी प्रोजेक्टसाठीचा 'पब्लिसिटी स्टंट' आहे, तर काही जण तिच्या या धाडसी आणि प्रामाणिक भूमिकेचे कौतुक करत आहेत. सनाचे हे विधान सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com