Samay Raina: 'बिअर बायसेप गाय'मुळे समय रैनाचा 'लॅटेंट शो' वादात; असं काय बोलला की होतेय शो बंद करण्याची मागणी?

Ranveer Allahbadia: संपूर्ण कार्यक्रमच अश्लील शेरेबाजीवर आधारित असून, या कार्यक्रमावर बंद घातली जावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
India's Got Latent Show Sparks Controversy Ranveer Allahbadia And Samay Raina
Ranveer Allahbadia And Samay RainaDainik Gomantak
Published on
Updated on

Samay Raina And Ranveer Allahbadia

कॉमेडियन समय रैनाचा Youtube वर सुरु असलेला शो वादात सापडला आहे. अश्लील शेरेबाजी आणि कमरेखालच्या विनोदांमुळे अल्पवधीत प्रसिद्धीस आलेल्या इंडियाज् गॉट लॅटेंट नावाचा शो बंद करण्याची मागणी केली जात आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये Youtuber रणवीर अल्लाहबादियाने केलेल्या अश्लील टीप्पणीवरुन नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

'बिअर बायसेप गाय' या युट्युब चॅनेलवरुन पॉडकास्ट करणारा रणवीर अल्लाहबादिया एका एपिसोडमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, एका स्पर्धकासोबत रणवीरने अश्लील संवाद साधला. यावरुन सध्या एक्सवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण कार्यक्रमच अश्लील शेरेबाजीवर आधारित असून, या कार्यक्रमावर बंद घातली जावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

India's Got Latent Show Sparks Controversy Ranveer Allahbadia And Samay Raina
Kala Academy: नाट्यविद्यालयातल्या समस्या म्हणजे 'ये रे माझ्या मागल्या'! विद्यार्थी स्वखर्चाने करतात प्रॉडक्शन, अकुशल शिक्षकांवर उधळपट्टी

मुंबई, महाराष्ट्रात याप्रकरणी रणवीर अल्लाहबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि इंडियाज् गॉट लॅटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त आणि महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, सक्त कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

India's Got Latent Show Sparks Controversy Ranveer Allahbadia And Samay Raina
Goa Kadamba Issue: 'कदंबाच वेळेत येणार नसेल तर पासचा काय फायदा'? प्रवास वेळखाऊ; वेळापत्रक बदलल्याने प्रवासी त्रस्त

राज्यसभा खासदार रेखा शर्मा यांनी देखील याप्रकरणी भाष्य करताना महिलांवर खालच्या पातळीवरील विनोद करणे अशोभनीय आहे, तसेच अशा गोष्टी समाजात स्विकार्य नाहीत. संबधित व्हिडिओ NCW ला पाठवण्यात आला असून, योग्य कारवाईची मागणी केलीय, असे शर्मा म्हणाल्या. दरम्यान, नेटकऱ्यांनी देखील शो बंद करण्याची मागणी लावून धरली आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ क्लिप शेअर करत शो बंद करावा, असे नेटकरी म्हणतायेत.

समय रैना च्या युट्युब चॅनेलवर इंडियाज् गॉट लॅटेंट नावाचा शो सुरु आहे. या शोमध्ये येणाऱ्या विविध स्पर्धकांना त्याचे टॅलेंट दाखवण्यासाठी ठराविक वेळ मिळते. स्पर्धकाचे सादरीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याने केलेले सादरीकरण आणि त्याच्या अर्ज यावरुन पॅनल आणि स्पर्धक यांच्यात संभाषण होतं. यातच अश्लील शेरेबाजी आणि विनोद केले जातात. अखेर पॅनल स्पर्धकाला मार्क देतात, मार्कची सरासरी आणि स्पर्धकाने स्वत:ला दिलेले मार्क एकच आल्यास स्पर्धक जिंकतो. जिंकणाऱ्या स्पर्धकाला कॅश प्राईज दिले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com