Salman Khan  upcoming film, Tiger 3
Salman Khan upcoming film, Tiger 3Dainik Gomantak

Salman Khan Viral Photo : सलमान खान टायगर 3 च्या सेटवरचा सलमानचा फोटो व्हायरल...

बॉलिवूडचा दबंग आगामी टायगर 3 च्या शूटींगमध्ये बिझी आहे
Published on

अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'टायगर 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रविवारी, सोशल मीडियावर एक चित्र समोर आले ज्यामध्ये सलमानने चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे.

यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमानने निळा शर्ट आणि फ्रेंच कॅप घातली आहे.वृत्तानुसार, हा फोटो 'टायगर 3' च्या सेटवरील आहे. टायगर आता तिसऱ्या भागात काय धुमाकूळ घालणार याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे.

सलमान या पार्टमध्ये सगळ्यांना पुरून उरणार का? आणि आपल्या गुप्त कामगिरी पार पाडणार का? याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी लाल रेड हार्ट आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये खूपच कमेंटस केल्या.

"टायगर अभी भी जिंदा है," एका चाहत्याने कमेंट केली.दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "लव्ह यू भाईजान." एका यूजरने लिहिले, "टायगर 3 साठी बाहेर पडलो."

Salman Khan  upcoming film, Tiger 3
HBD Janhvi Kapoor :"जान्हवीने डॉक्टर व्हावं असं का वाटत होतं श्रीदेवींना होतं?

'टायगर 3' हा टायगर फ्रेंचायझीचा तिसरा भाग मनीष शर्माने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट या दिवाळीत हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. आगामी अॅक्शनरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com