Salman Khan : सलमान खानच्या 'किसी का भाई,किसी की जान'चं टिजर रिलीज

अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'चं टिजर रिलीज झालं आहे.
Salaman Khan
Salaman Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीजची घोषणा झाल्यापासून मेगास्टार सलमान खानचे चाहते 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाचा टिझर लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र टिझरबद्दल चर्चा सुरु होती.

'किसी का भाई किसी की जान'या चित्रपटातील सलमान खानची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.अशातच, आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला आहे आणि हा टिझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

टिझरची सुरुवात सलमानच्या "सही का होगा सही, गलत का होगा गलत" या डायलॉगने होत असून यामध्ये सलमान खानचा सिग्नेचर स्वॅग पाहायला मिळेल. तसेच, या टिझरमध्ये "वैसे मेरा कोई नाम नहीं, पर में भाईजान के नाम से जाना जाता हूं" यांसारख्या लाईन्स आणि असे काही सीन आणि डायलॉग्स आहेत जे येत्या काळात प्रचंड फेमस होतील.

सलमान खानचे चित्रपट रिलीज नेहमीच एका मेगा फेस्टिव्हलसारखे असतात. अशातच, ईदच्या खास मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असून, या सिनेमात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, ज्यामुळे हा एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर बनतो.

Salaman Khan
Pathan Movie : मध्यप्रदेशात बजरंग दलाने पठाणचे पोस्टर पेटवले, चित्रपट धर्मविरोधी असल्याचे सांगत शो बंद पाडले..

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com