सलमान खानने शेअर केला 'भाची'सोबतचा गोड फोटो...एक्स गर्लफ्रेंडची कमेंट येताच यूजर्सच्या भुवया उंचावल्या

अभिनेता सलमान खानने भाची अलिजेहसोबतचा एक गोड फोटो शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
Bollywood actor Salman Khan
Bollywood actor Salman KhanDainik Gomantak

Salman Khan Shares photo with nephew Alizeh : अभिनेता सलमान खानचे करोडो फॅन्स आहेत. अनेक तरुणींसाठी सलमान खान एक गोड स्वप्न आहे ;पण सलमान लहान मुलांसाठीही तितकाच मोठा स्टार आहे.

सलमान खानच्या फिल्म्स बघायला लहान मुलांचीही थिएटरबाहेर झालेली गर्दी आपण कित्येकदा आपण पाहिली असेल.

सलमानही अनेकदा लहान मुलांच्यात रमतो. भाऊ सोहेल खान आणि आपल्या बहिणींच्या मुलांसोबतही अनेकदा वेळ घालवताना दिसतो. नुकतेच सलमानने आपली भाची अलिजेहसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सलमानचे अलीकडचे काही चित्रपट

सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. सलमानने आपली 'भाईजान' हीच ओळख आपल्या व्यक्तिमत्त्वाने निर्माण केली आहे.

अलीकडच्या काही वर्षात सलमानचे 'भारत', 'सुलतान', 'एक था टायगर', 'प्रेम रतन धन पायो', यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी चाहत्यांचं मनोरंजन केले आहे.

भाचीसाठी पोस्ट

सलमान खान एक असा अभिनेता आहे जो कुटूंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देतो. एक प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच सलमानने एक प्रेमळ मुलगा आणि भाऊ या भूमीकांना देखील व्यक्तिगत आयुष्यात न्याय दिला आहे.

 सलमानने त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीसाठी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक सुंदर नोट लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे.

'अलिजेह'सोबतचा फोटो

16 सप्टेंबर रोजी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अलीझेह अग्निहोत्रीसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. 

सलमान खानने आपल्या भाचीला मांडीवर घेतले असून दोघेही निरागसपणे एकमेकांकडे पाहत आहेत. 

सलमानची गोड नोट

फोटो शेअर करताना सलमानने आपल्या भाचीसाठी एक सुंदर चिठ्ठी लिहिली आणि तिच्या करिअरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. 

अभिनेत्याने आपल्या भाचीला तिच्या आयुष्यात कठोर परिश्रम करण्याची आणि नेहमी स्वतःशी स्पर्धा करण्याचा सल्लाही दिला आहे.

सलमान लिहितो

सलमान खान लिहितो, 'मामूवर एक उपकार कर. तुम्ही जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीने करा! नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सरळ जा आणि उजवीकडे वळ. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा. 

फिट होण्यासाठी एकसारखे होऊ नका आणि वेगळे होण्यासाठी वेगळे होऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा तुम्ही प्रॉमिस केलं केली की, कुणाचंही ऐकू नका.

Bollywood actor Salman Khan
विचित्र फॅन...भाग्यलक्ष्मी फेम आकाश चौधरीला रिकामी बॉटल फेकून मारली...व्हिडीओ व्हायरल

संगीता बिजलानीची प्रतिक्रिया

सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर हँडलवर पोस्ट टाकताच, त्याचे मित्र आणि चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट विभागात प्रतिक्रियांचा पूर आला. सलमान खानच्या या पोस्टवर अलीझेहने प्रतिक्रिया दिली.

 त्याने लिहिले, 'धन्यवाद मामू.' अब्दू रोजिक म्हणाला, 'खूप गोंडस माशाल्ला.' संगीता बिजलानी यांनीही लिहिले, 'खूप सुंदर शब्द.' त्याचवेळी, फलक नाज, प्रियांका चहर चौधरी, ताहिर शब्बीर यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com