Salman Hugs Vicky Kaushal : सलमानने विकीला आलिंगन देत वादावर पडदा टाकला... व्हिडीओ पाहिलात का?

अभिनेता सलमान खान आणि विकी कौशल यांचा IIFA पुरस्कार सोहळ्यातला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यानंतर झालेल्या सोशल मिडीयावर सलमानला टीकेला सामोरं जावं लागलं होतं...आता दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे...
Salman Hugs Vicky Kaushal
Salman Hugs Vicky Kaushal Dainik Gomantak

अभिनेता सलमान खानचा एक वेगळाच स्वॅग आहे. सलमान कधी प्रेमाने बोलेल तर कधी भडकुन बोलेल हे सांगता येत नाही. सलमानच्या लहरी स्वभावाचा अनुभव घेतलेले बरेच जण आहेत. आता हा अनुभव विकी कौशलने अनुभवला आहे.

दोन दिवसांपुर्वी IIFA पुरस्कार सोहळ्यात सलमानने विकीला खुन्नस देत एक लूक दिला होता तर सलमानच्या बॉडीगार्डने विकीला एखाद्या सामान्य माणसासारखे दूर ढकलले होते. आता सलमानने विकीला मिठी मारत या वादावर पडदा टाकला आहे.

सलमान खानने विकी कौशलकडे दुर्लक्ष आणि गैरवर्तन केलं असं जुन्या व्हायरल व्हिडीओमुळे सर्वांना वाटत होतं . या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या सुरक्षेसह ग्रीन कार्पेटवर फिरताना दिसत आहे, तर विकी कौशल काही अंतरावर मुलाखत देत आहे. 

त्यानंतर सलमान खान मागून जातो आणि आधी विकी कौशलच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मग त्याला मिठी मारतो. सलमान खान आणि विकी कौशल व्हिडिओमध्ये काही सेकंद एकमेकांशी बोलतात आणि त्यानंतर सलमान विकीला मिठी मारतो…

सलमान खान आणि विकी कौशलचा IIFA 2023 मध्ये मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, सलमान खान त्याच्या दबंग शैलीत काळ्या रंगाच्या सूटमध्ये चालतो, विकी कौशलकडे जातो आणि मुलाखतीत व्यत्यय आणत विकीला मिठी मारतो. 

सलमान खानच्या या वागण्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे, तर काही लोक सलमान-विक्कीच्या ग्रीन कार्पेटचा हा व्हायरल व्हिडिओ कतरिना कैफसोबत जोडत आहेत. 

जुना व्हायरल व्हिडीओ

IIFA 2023 पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सलमान खानचा सुरक्षा काफिला विकी कौशल सारख्या अभिनेत्याला ढकलताना दिसत होता. वास्तविक, सलमान खान आयफा 2023 कार्यक्रमात त्याच्या सुरक्षेसह प्रवेश करताच त्याला विकी कौशल गेटवर मिळतो.

 'भाईजान'च्या रक्षकांनी विकीला मागे ढकलल्यावर विकी थांबतो आणि सलमानशी बोलतो. चालता बोलता सलमानही पुढे जातो. सलमान खान आणि विकी कौशल मुव्हीजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सलमानलाही खूप ट्रोल करण्यात आले आहे. 

Salman Hugs Vicky Kaushal
Inspector Avinash Review : रणदीप हूडाने साकारलेला इन्स्पेक्टर अविनाश...चला पाहुया वेब सिरीजचा रिव्यू...

सलमान भाई आता हॉटेल चालवणार

काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता हॉटेल व्यवसायाकडे वळणार आहे. सलमान खानच्या या नव्या हॉटेलचं बांधकाम मुंबईत सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सलमान खानचे आर्किटेक्ट सप्रे अँड असोसिएट्स यांनी न्यू डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (DCPR 2034) अंतर्गत मध्यवर्ती वातानुकूलित आणि व्यावसायिक वापरासाठी या 69.90 मीटर इमारतीचा वापर करण्यासाठी अर्ज केला आहे. या इमारतीत तीन तळघर आहेत.  

नवीन योजनेनुसार पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू करता येतील. यासोबतच तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर इतर सेवा, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. तर सातव्या ते १९व्या मजल्याचा वापर हॉटेलसाठी केला जाणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com