Salman Khan In Pushpa 2 : पुष्पा 2 मध्ये बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार दिसणार?

पुष्पा 2 मध्ये अजय देवगन किंवा सलमान खान दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pushpa 2
Pushpa 2Dainik Gomantak
Published on
Updated on

पुष्पा : द रायजिंग या चित्रपटाने देशभरात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले होते, पुष्पाचा म्हणजेच अल्लू अर्जुनचा अभिनय आणि डान्स जगभरातल्या त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतला होता. आता पुष्पाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. (Salman Khan In Pushpa 2)

'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. साऊथवर तसेच बॉलीवूड चाहत्यांवरही याने आपली जादू चालवली होती.

 आता असे म्हटले जात आहे की पुष्पा: द रुलची पटकथा पुन्हा लिहिली जात आहे आणि बॉलीवूडमधला एक सर्वात मोठा सुपरस्टार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

फहद फाजील सोबतच, रश्मिका मंदान्ना देखील दिग्दर्शक सुकुमारच्या तेलुगू अॅक्शन ड्रामा फिल्म स्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच समंथा रुथ प्रभू एका खास गाण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 

आता दिग्दर्शक सुकुमार 'पुष्पा 2' मध्ये बॉलिवूडच्या टॉप सुपरस्टारला कास्ट करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. असे सांगितले जात आहे की तो सलमान खान किंवा अजय देवगण असू शकतो. पण, याबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.

Pushpa 2
Elon Musk On Natu Natu: "टेस्ला कार नाचल्या नाटू नाटूच्या तालावर" आता एलॉन मस्क यांचं ट्विट चर्चेत

सुमारे दोन वर्षांपूर्वी मनोज बाजपेयी यांना 'पुष्पा 2'साठी अप्रोच करण्यात आल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. मात्र, नंतर 'फॅमिली मॅन' मनोजने या अफवांचे खंडन केले. 

मिळालेल्या माहितीनुसार असे म्हटले आहे की 'पुष्पा 2' चे शूटिंग या महिन्याच्या अखेरीस बेंगळुरूमध्ये सुरू होईल आणि फहद फाजील देखील अल्लू अर्जुनसोबत या शूटिंग शेड्यूलमध्ये सामील होणार आहे. या सगळ्याशिवाय या चित्रपटात सई पल्लवीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com