Salaar Box Office Collection: डंकीला मागे टाकत प्रभासच्या सालारचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ

Salaar Box Office Collection: राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'डंकी' सालार समोर टिकणार नाही, असे 'सालार'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच स्पष्ट केले होते.
Salaar
Salaar Dainik Gomantak

Salaar Box Office Collection: प्रभासच्या सालारने चित्रपटगृहात येताच धुमाकूळ घातला आहे. KGF 2 नंतर प्रशांत नीलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की पडद्यावर कृती आणि हिंसा दाखवण्यात त्याची बरोबरी कोणीही करु शकत नाही.

आत्तापर्यंत 'अ‍ॅनिमल'मधली हत्या आणि विध्वंस पाहून सोशल मीडियावर तूफान आले होते. त्याहून दुप्पट हिंसा असलेल्या 'सालार'ला प्रचंड टाळ्या मिळत आहेत हे विशेष आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'डंकी' सालार समोर टिकणार नाही, असे 'सालार'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच स्पष्ट केले होते.

'डिंकी'ने रिलीजपूर्वी 15.41 कोटी रुपयांचे आगाऊ बुकिंग केले होते, कमी शो असूनही, 'सालार'चे आगाऊ बुकिंग 48.94 कोटी रुपये होते. मात्र, नंतर चित्रपटाची मागणी पाहता 'सालार'चे शो आणि स्क्रीन काउंट आता वाढले आहे.

Salaar
Bigg Boss 17: 'विकीने अंकिताला मारण्याचा प्रयत्न केला...' अभिषेक अन् अरुणने केले गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, 'सालार' ने पहिल्या दिवशी देशात 95.00 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. हे सुरुवातीचे आकडे आहेत. 'सालार' आता देशभरात 6000 हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. शुक्रवारनंतर आता 'सालार' शनिवारीही मोठी कमाई करणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या दिवशीही १९ कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.

प्रभास आणि प्रशांत नीलच्या चाहत्यांना या चित्रपटाचे वेड लागले आहे. शुक्रवारी मॉर्निंग शोमध्येही 100 पैकी 88 जागांवर प्रेक्षक दिसले. तर रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या 93% पर्यंत वाढली आहे. 'सलार'चे बजेट 270 कोटी रुपये आहे.

यात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि श्रुती हसन यांच्याही भूमिका आहेत. सालार' रिलीज होताच 'डंकी'ला बॉक्स ऑफिसवर झटका बसला आहे. 'पठाण' आणि 'जवान' नंतर, शाहरुखने 2023 मध्ये ब्लॉकबस्टरची हॅटट्रिक गमावली आहे.

'डंकी'ने गुरुवारी पहिल्या दिवशी 29.50 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शुक्रवारी त्याची कमाई 20.50 कोटींवर घसरली आहे. आता सालार बॉक्स ऑफीसवर आणखी कोणते रेकॉर्ड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com