Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने शेअर केलं या मराठी चित्रपटाचं पोस्टर

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने आपल्या सोशल मिडीयावरुन एका मराठी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुधवारी जाहीर केले की, बाईपन भारी देवा हा मराठी चित्रपट ३० जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तेंडुलकरने आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. जिओ स्टुडिओच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले जे स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करतात.

एक मनोरंजक कौटुंबिक नाटक म्हणुन हा चित्रपट खूप काही सांगेल, हा चित्रपट जीवनाचे काही महत्त्वाचे धडे शिकवेल, 'बाईपण भारी देवा'मध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या माने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या भूमिका आहेत. केदार शिंदे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

Sachin Tendulkar
Satish Kaushik Passes Away : जेव्हा सतीश कौशिक या गरोदर अभिनेत्रीशी लग्न करायला तयार होते....

 या चित्रपटात महिलांशी संबंधित विविध पैलू दाखवण्यात आल्याचे तेंडुलकर म्हणाले. क्रिकेटरने ट्विट केले की, “आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या नात्याने स्त्रीत्व स्वीकारून पुढे जाणाऱ्या महिलांचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे. 

त्याचा 'करिश्मा' मी माझ्या आयुष्यात अनुभवला आहे. आता तुम्ही सुद्धा 30 जून रोजी "बाईपण भारी देवा" हा चित्रपट पाहून अनुभवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com