RRR Screening In Foreign : एसएस राजामौली यांचा RRR भारतात थिएटरमध्ये रिलीज होऊन लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. जेव्हापासून हा चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांनी बघीतला आहे तेव्हापासुन जगभरातून या चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळाले आहे. पुरस्कारांच्या रूपानेही या चित्रपटाला समीक्षकांकडून दाद मिळत आहे.
गेल्या आठवड्यात ऑस्करपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये या चित्रपटाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे स्क्रिनींग पाहायला मिळाले. ही माहिती RRR च्या ट्विट्टर हॅंडलवरून मिळाली आहे.
RRR चं स्क्रिनींग 1 मार्च रोजी Ace हॉटेल, लॉस एंजलिस इथं करण्यात आलं जिथे 1400 हून अधिक लोक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी 1647 तिकीटं विकली गेली शिवाय यावेळी थिएटरच्या बाहेर लांबलचक रांगा दिसल्या.
95 व्या अकादमी पुरस्काराच्या म्हणजेच ऑस्करच्या काही दिवस आधी हे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते जेथे RRR ला बहुचर्चित 'नाटू नाटू'साठी 'सर्वोत्कृष्ट गाणे' श्रेणी अंतर्गत नामांकन मिळाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. एलए मधील स्क्रिनिंगमध्ये, हे गाणे वाजल्यावर चाहते जल्लोष करताना आणि हूटिंग करताना दिसले
मेगा पॉवर स्टार राम चरणचे स्क्रिनिंगच्या वेळी चाहत्यांच्या जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने परदेशी चाहते उपस्थित होते. वर्ल्ड स्टार राम चरण, एसएस राजामौली आणि संपूर्ण थिएटर चित्रपटाचं कौतुक करत होती.
RRR ला अलीकडेच हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्करपूर्वी हा चित्रपट यूएसएमधील जवळपास ३०० चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे.
जागतिक स्टार सोबत, एसएस राजामौली, एमएम कीरावानी, एसएस कार्तिकेय आणि डीओपी सेंथिल कुमार स्क्रीनिंगला उपस्थित होते आणि त्या सर्वांनी उभे राहून स्वागत केले.
RRR ला आता ऑस्करच्या यादीत प्रवेश मिळाला आहे. 13 मार्चला याचं लाईव्ह प्रसारण सर्वांना पाहता येणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतीय प्रेक्षकांसोबतच देश विदेशातही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.