RRR Success in Japan : RRR नं आता जपान गाजवलं, राजामौलींनी ट्विट करत आनंद व्यक्त केला...

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR ने आता जपानमध्येही यशाचा डंका वाजवला आहे.
RRR
SS Rajamauli
RRR SS Rajamauli Dainik Gomantak
Published on
Updated on

RRR success In Japan : साऊथचा सिनेमा साता समुद्रापार जाऊन कसे यश मिळवू शकतो याचे उदाहरण RRR च्या रुपाने समोर आले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सिनेमा रसिक या चित्रपटाला डोक्यावर घेत आहेत. एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट सातत्याने यशाचे नवे विक्रम नोंदवत आहे. या चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. याआधीही या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. 

या चित्रपटाच्या नावात आता आणखी एका यशाची भर पडली आहे, ज्याने केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर भारताचे नावही अभिमानास्पद केले आहे. 'RRR' हा जपानमधील बॉक्स ऑफिसवर १०० दिवस पूर्ण करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

'आरआरआर' चित्रपटाला जपानमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बंपर कमाईसह 100 दिवस पूर्ण केले आहेत. जपानमध्ये 'RRR'चे 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौलीही खूप आनंदी होते. राजामौली यांनी ट्विट करून आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला. 

त्यांनी लिहिले, 'त्या काळात चित्रपट १०० दिवस, १७५ दिवस चालणे ही मोठी गोष्ट होती. काळाच्या ओघात व्यवसायाची रचना बदलत गेली. त्या गोड आठवणी निघून गेल्या, पण जपानी चाहते आम्हाला आनंद देत आहेत. लव्ह यू जपान.

RRR
SS Rajamauli
Pawan Kalyan: पवन कल्याण विवाहित असुनही या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा..पण दुसरे लग्नही टिकले नाही...

'RRR' 21 ऑक्टोबरला जपानमध्ये रिलीज झाला होता. रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाला जपानी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. देशातच नाही तर परदेशातही 'आरआरआर' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटातील नातू नातू या गाण्याने ऑस्कर नामांकनांच्या यादीत स्थान मिळवून संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.

'RRR' हा चित्रपट १२ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 1,200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी डब चित्रपट 20 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि लवकरच हा चित्रपट जगभरातील OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपट बनला. या चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्याला नुकताच 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com