Rohit Shetty's Upcoming Web Series : रोहित शेट्टीची ही आगामी वेब सिरीज येतेय दिवाळीत...

दिग्दर्शक रोहित शेट्टीची आगामी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Rohit Shetty
Rohit Shetty Dainik Gomantak

रोहित शेट्टी  हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील पोलिसांवर चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असणारं नाव आहे. आतापर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांंमध्ये रोहित शेट्टीने पोलिसांची इमेज पडद्यावर सकारात्मकच दाखवली आहे.

आपल्या इमेजला साजेशी अशी नवी वेब सिरीज आता रोहित शेट्टी त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. इंडियन पोलिस फोर्स (IPF) नावाच्या कॉप थ्रिलरसह रोहित शेट्टी डिजिटल पदार्पणाची तयारी करत आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या या वेबसिरीजचं रोहित शेट्टीने गेल्या वर्षभरात भारतभर विविध ठिकाणी शूट करण्यात केलं आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​प्रमुख भूमिकेत आहे आणि त्यात विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी प्रमुख सहाय्यक भूमिकेत आहेत. शूटिंग पूर्ण झाले आहे आणि सिरीज सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे.

या प्रॉडक्शनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅमेझॉन प्राइम आणि रोहित शेट्टी दिवाळीच्या वीकेंडमध्ये त्यांचा भव्य अॅक्शन थ्रिलर वेब सिरीज रिलीज करणार आहेत . "गेल्या काही वर्षांपासून, रोहित शेट्टीने दिवाळीच्या काळात सातत्याने आपल्या प्रेक्षकांना चित्रपट दिले आहेत आणि या वर्षी 'इंडियन पोलिस फोर्स'ने ही परंपरा कायम ठेवली आहे.

OTT साठी कंटेट तयार करण्याच्या नेहमीच्या स्टाईलच्या उलट, IPF ही कौटुंबिक वेब सीरिज आहे.रोहितने सांगितले कि ओटीटीच्या स्टाईलमुळे तो त्याची स्टाईल बदलणार नाही. त्याची नेहमीचीच स्टाईल या सिरीजमध्ये दिसणार आहे.

Rohit Shetty
Big Boss OTT : बिग बॉस ओटीटी मधुन आता करण जोहरची सुट्टी...हा सुपरस्टार करणार होस्ट

सध्या, या वेब सिरीजचं एडिटिंगचं काम सुरू आहे. आणि टीमला खात्री आहे की हा कंटेट प्रेक्षकांवर प्रभाव पाडेल. ही कथा दिल्लीत घडते, सिड हा मिशनचा लीडर आहे आणि बेकायदेशीर बाबींभोवती त्याची गोष्ट फिरत राहते. ' सिंघम ' (2011), 'सिम्बा' (2018), आणि 'सूर्यवंशी' (2021) यासह रोहित 'इंडियन पोलिस फोर्स' रोहितच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली नवी वेबसिरीज असेल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com