Robert Downey Jr. : काय सांगता?... या अभिनेत्याने चघळून थुंकलेल्या च्युईंग गमचा 45 लाखांना लिलाव...

प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याची क्रेझ काही वेगळीच आहे
Robert Downey Jr
Robert Downey JrDainik Gomantak
Published on
Updated on

सिनेसृष्टीचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सवर खूप प्रेम करतात. मग ते बॉलीवूड स्टार असो की हॉलिवूड, त्यांना पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दलची क्रेझ निर्माण होते. हॉलिवूडचा स्टार आयर्न मॅन फेम सुपरस्टार रॉबर्ट डाउनी जूनियरबद्दल बोलायचे झाले तर ही क्रेझ चौपट झाली आहे. 

रॉबर्टचे चाहते फक्त हॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही आहेत, मात्र याचदरम्यान त्याची अशी एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही.

तुमचा विश्वास बसणं कठीण आहे, पण हे खरे आहे की आयर्न मॅन फेम रॉबर्ट डाऊनी ज्युनियरचा च्युइंगम थुंकला जातो, ज्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रॉबर्टचे थुंकलेले च्युइंगम लिलावासाठी तयार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही च्युइंगम ४५ लाख रुपयांना विकली जात आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अंतिम किंमत नसून मूळ किंमत आहे.गंमत म्हणजे या च्युइंगमचा eBay वर लिलाव केला जात आहे. या बातमीवर सोशल मीडिया यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Robert Downey Jr
HBD Kapil Sharma : लहानपणीच वडिल गेले, सततचं रिजेक्शन आणि आज तो बनलाय कॉमेडी किंग...

13 फेब्रुवारी 2023 रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरजवळ अभिनेता आणि चित्रपट निर्माता जॉन फावारोच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टारचे अनावरण करण्यात आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर अनेक सिनेतारक आणि चित्रपट निर्मात्यांच्या नावावर एक स्टार आहे. 

यावेळी रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि इंटरनॅशनल शेफ रॉय चोई हे चित्रपट निर्माते जॉन फावारो यांच्यासोबत उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान रॉबर्टने तोंडातून च्युइंगम काढून जमिनीवर चिकटवले. मग काय, एका माणसाने ती च्युइंगम उचलली आणि eBay वर लिलावासाठी ठेवली. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com