Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput Dainik Gomantak

Rhea Chakraborty :सुशांत सिंह राजपुतच्या संदर्भात रिया चक्रवर्तीने काय पोस्ट केली? प्रकरण पुन्हा चर्चेत

रिया चक्रवर्तीने केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Published on

सुशांत सिंह राजपूत केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कूपर हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने सुशांतची हत्याच झाल्याचा दावा केला आणि पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं. सुशांतला न्याय मिळायला हवा ही मागणी एकीकडे जोर धरत असताना दुसरीकडे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या एका पोस्टने पुन्हा एकदा या प्रकरणाला हवा मिळाली आहे.

कूपर हॉस्पिटलच्या शवागृहाचा कर्मचारी रूपकुमार शाह याने एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे, त्यामुळे मध्यंतरी शांत झालेलं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शाह या कर्मचाऱ्याने अभिनेता सुशांत सिंह राजपुत याची हत्या झाल्याचं सांगितल्याने हे प्रकरण आता आणखी गूढ झालं आहे.

इंन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये रिया चक्रवर्ती आग, वादळ, ताकद आणि सैतान अशा शब्दांचा वापर केला आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आरोपी म्हणुन समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळा संदर्भ मिळतो. रिया चक्रवर्तीचे अभिनेता सुशांत सिंह राजपुतसोबत काही काळ प्रेमसंबंध होते.

Sushant Singh Rajput
Pathan Controversy : आपण दिवसेंदिवस छोट्या विचारांचे होत चाललो आहोत, पठाणच्या वादावर बोलल्या आशा पारेख..

सुशांतच्या बहिणी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान रिया रिया चक्रवर्तीची ही पोस्ट समोर आल्याने प्रकरणाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रिया चक्रवर्तीने इंन्स्टाग्रामच्या या पोस्टमध्ये लिहलंय "तुम्ही आगीतुन गेला आहात, पुरातुन वाचला आहात आणि राक्षसांवर विजय मिळवला आहे. पुढच्या वेळी जेव्हा स्वत:च्या शक्तीवर संशय व्यक्त कराल तेव्हा हे लक्षात ठेवा".

14 जून 2020 रोजी मुंबईच्या फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या नसुन हा कट असल्याचा संशय सुशांतच्या वडिलांनी केला होता. तसंच या आत्महत्येत रिया चक्रवर्तीचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

आता रिया चक्रवर्तीने केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com