रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना ‘रास नही आते’

चाहत्यांनी खूप दिवसांपासून अन्नाथे चित्रपटाची वाट पाहिली परंतु या चित्रपटाने प्रेक्षकांचा अपेक्षा भंग केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Rajnikanth
RajnikanthDainik Gomantak

चित्रपटातील रजनीकांत यांची व्यक्तिरेखा कालियाची असून, ज्याचे आयुष्य त्याच्या बहिणींभोवती असते, त्याच्या बहिणींचे लग्न जवळच्या गावात व्हावे अशी कालियाची इच्छा असते, परंतु कालियाचे त्याच्या बहिणींवर खूप प्रेम असल्याने त्याचा आपल्या पुढे आपल्याही त्रास होऊ शकतो या विचाराने त्याच्या बहिणींशी कोणी लग्न करण्यास तयार होत नाही. मग कालियाचा शत्रू (प्रकाश राज) त्याच्या भावाचे नाते त्याच्या बहिणीशी आणतो. पण लग्नाआधी तो गायब होतो, त्यामुळे चित्रपटातील कथेला नवे वळण लागते. चित्रपटाच्या पूर्वार्धात भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम दिसुन येत आहे. खुशबू, मीना, सतीश, सुरी यांचे काही कॉमेडी सीन्स देखील या चित्रपटात आहेत.

चित्रपटामध्ये नयनताराने वकिलाची भूमिका चांगली निभावली आहे, पण तिची उपस्थिती चित्रपटामध्ये खलुन येत होती. कीर्ती सुरेशनेही चांगली भूमिका साकारली असली तरी मेलोड्रामामुळे चाहत्यांमध्ये तिच्या बद्दल नाराजी दिसुन येत आहे.

Rajnikanth
Birthday Special: अजय देवगनमुळे मी सिंगल

चित्रपटात रजनीकांत मुख्य भुमिकेत दिसून येत आहेत. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज आणि कॉमिक लाईन्स चांगली असतात, पण काही वेळाने सगळेच रिपीटेशन व्हायला लागेते आणि येणाऱ्या सीनमध्ये असंच घडेल असा अंदाज तुम्हाला लगेच येतो. चित्रपटात इमानचे गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. मात्र, इंटरवलनंतर चित्रपट बराच लांबला आहे. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटत आहे. दिग्दर्शक शिवा यांनी अनाथे चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रजनीकांत यांच्यासोबत ते पहिल्यांदाच काम करत आहेत. याआधी शिवाने 9 चित्रपट केले असून त्याचे चित्रपट चाहत्यांनी चांगलेच पसंतीस उतरले आहेत. शिवा हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. शिवाने चित्रपटातून काही वेगळे दाखवण्याच सतत प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com