Salman Khan: धमकीचं पत्र मिळाल्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत वाढ

Salman Khan Death Threat: महाराष्ट्राच्या गृह खात्याने सलमान खान (Salman Khan) च्या सुरक्षेत वाढ केली आहे.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak

महाराष्ट्राच्या गृह खात्याने बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही पोलीस अधिकारी सलमान खानच्या घरी पोहोचले आहेत. 5 जून रोजी सलमान आणि सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. (Salman Khan Death Threat News)

मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील, डीसीपी मंजुनाथ शिंगे, स्थानिक वांद्रे पोलिसांचे पथक सलमानच्या घरी चौकशी करता गेले होते. या प्रकरणी सलमान खानकडून माहिती घेण्यात आली आहे. त्याचा अधिकृत जबाबही घेण्यात येणार आहे.

Salman Khan
अभिनेता सलमान खान व वडील सलीम यांना धमकीचे पत्र

* सलीम खान यांना मिळाले धमकीचे पत्र

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवारी म्हणजे 5 जूनला एक धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळाले, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका

संगीतकार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होता. त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात आले होते. सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com