"इतरांचा वापर करुन शाहरुख नंतर त्यांना दूर करतो" गायक अभिजीत असं का म्हणाला?

गायक अभिजीतने शाहरुख खानविषयी एक विधान केलं आहे ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
Singer Abhijeet on shahrukh khan
Singer Abhijeet on shahrukh khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Singer Abhijeet on shahrukh khan : तौबा तुम्हारे ये इशारे, सुनो ना सुनो ना, मै कोई ऐसा गीत गाऊ यांसारख्या कित्येक गाजलेल्या गाण्यांवर आपण शाहरुख खानला रोमान्स करताना पाहिले आहे.

ही गाणी ज्याने गायली असा प्रसिद्ध गायक अभिजीतने शाहरुख खानवरच गंभीर टिप्पणी केली आहे. त्याच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चला पाहुया अभिजीत नेमकं काय म्हणाला?

शाहरुख खान आणि अभिजीत भट्टाचार्य

एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान ( Shahrukh khan) आणि अभिजीत भट्टाचार्य(singer abhijeet ) या जोडीने मोठ्या पडद्यावर आग लावली होती. 

म्युझिक इंडस्ट्रीतील दिग्गज गायक अभिजीतने शाहरुख खानच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला , परंतु ' बिल्लू ' चित्रपटानंतर त्याने कधीही शाहरुखसाठी गाणे गायले नाही. आता वर्षांनंतर अभिजीत शाहरुखबद्दल बोलला आहे.

शाहरुखचे कौतुकही केले

अलीकडेच, अभिजीत भट्टाचार्यने त्यांचा वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष विसरून शाहरुख खानचे कौतुक केले . सोबत त्याची खिल्ली उडवली. अभिजीतने लेहारन रेट्रोसोबतच्या संवादात शाहरुखला सेल्फ मेड स्टार म्हटले आहे. तसेच त्याचे व्यावसायिक व्यक्ती म्हणून वर्णन केले. 

Singer Abhijeet on shahrukh khan
कटरीनाच्या टॉवेल फाईट सीनवर विकी कौशल अखेर बोललाच म्हणाला...

शाहरुख देशभक्त आहे

अभिजीत भट्टाचार्य म्हणतो की , शाहरुख खान यशासाठी लोकांचा वापर करत असला तरी त्याला देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे. अभिजीत म्हणाला, "आम्हा दोघांचा स्वभाव सारखाच आहे. आमच्यात अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे." अभिजीत भट्टाचार्यने शाहरुखचे कौतुक करत त्याला महान देशभक्त म्हटले. 

शाहरुखसाठी पुन्हा गायला नाही

अभिजीतने शाहरुखच्या 'अंजान', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'बादशाह', 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम'सह अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत . अभिजीतची तक्रार होती की त्याचे नाव चित्रपटाच्या श्रेय नामावलीमध्ये नेहमी सर्वात शेवटी दिसत होते. 

2009 मध्ये जेव्हा अभिजीतने ' बिल्लू'साठी 'खुदाया खैर' हे गाणे गायले होते , तेव्हा त्याची अट होती की या गाण्यात शाहरुखला चित्रित करू नये. पण निर्मात्यांनी हे मान्य केले नाही आणि त्यांनी सोहम चक्रवर्तीला हे गाणे पुन्हा गायला लावले. तेव्हापासून अभिजीतने शाहरुखसाठी एकही गाणे गायले नाही. 

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com