Actor Prakash Raaj on Kangna Ranuat
Actor Prakash Raaj on Kangna RanuatDainik Gomantak

"भारताला 2014 मध्येच स्वातंत्र्य मिळाले" कंगनाच्या त्या वक्तव्याची आठवण काढत प्रकाश राज म्हणाले

नुकताच प्रकाशराज यांनी कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाच्या कमाईवरुन तिला आपल्या शैलीत टोमणा मारला आहे.
Published on

Actor Prakash Raaj on Kangna Ranuat : अभिनेते प्रकाश राज नेहमीच आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असतात. आपलं मत खुलेपणाने मांडताना प्रकाश राज कधीच कुणाची भीडभाड बाळगत नाहीत.

नुकतंच प्रकाशराज यांनी कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाच्या कमाईवरुन तिला आपल्या शैलीत टोमणा मारला आहे.

कंगना रणौतवर निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. 

चित्रपटाची कमी कमाई लक्षात घेता प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन 'तेजस' पाहण्याचे आवाहन अभिनेत्रीने केले आहे. त्याच वेळी, आता कंगना रणौतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि थिएटरमध्ये कमी प्रेक्षकसंख्येबद्दल बोलले, ज्यावर दक्षिण अभिनेता प्रकाश राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

अभिनेते प्रकाश राज त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात .  प्रकाश राज सोशल मीडियावर कंगना राणौतसोबत अनेकदा भांडताना दिसतात. कंगनाच्या पोस्टवर प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगना राणौतच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अभिनेता प्रकाश राज म्हणाले, 'भारताला नुकतेच 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. कृपया थांबा. तुमच्या चित्रपटाला गती मिळेल.

कंगनाचा व्हिडिओ

आपल्या चित्रपटाबद्दल व्हिडिओमध्ये बोलताना, अभिनेत्री कंगना म्हणाली, 'मित्रांनो, माझा तेजस हा चित्रपट काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 

ज्याने हा चित्रपट पाहिला आहे ते आपले खूप कौतुक करत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत, पण मित्रांनो, कोविड 19 नंतर आपला हिंदी चित्रपट उद्योग पूर्णपणे सावरलेला नाही. 99% चित्रपटांना प्रेक्षकांनी संधी दिली नाही. 

मला माहित आहे की आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी मोबाईल फोन आणि टीव्ही आहे, परंतु तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकता आणि कुटुंब आणि मित्रांसह आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला उरी, मेरी कोम आणि नीरजा आवडत असतील तर तुम्हाला तेजस देखील आवडेल.

Actor Prakash Raaj on Kangna Ranuat
ए दिल है मुश्किलमध्ये शाहरुख ऐवजी हा अभिनेता करणार होता काम ;पण अचानक

कंगनाचा तेजस

तेजस हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित या चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कंगना रणौत व्यतिरिक्त अंशुल चौहान आणि वरुण मित्रा देखील दिसले. या चित्रपटाला समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com