Raveena- Karishma Catfight: करिश्मा अन् रवीना यांचे 'हे' भांडण तुम्हाला माहीत आहे का?

Raveena- Karishma Catfight: हे भांडण एकाच व्यक्तीमुळे झाले होते.
Raveena Tandon- Karishma Kapoor
Raveena Tandon- Karishma KapoorDainik Gomantak
Published on
Updated on

Raveena- Karishma Catfight: बॉलीवूडमधील सितारे आपल्या चित्रपटांसाठी जितके ओळखले जातात. तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. कधी त्याचे रिलेशन, कधी त्यांचे भांडण तर कधी त्यांचे फोटोज या चर्चांचे कारण बनतात.

आता रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्या भांडणाचा खुलासा करणारा एक व्हिडिओ पून्हा व्हायरल होताना दिसत आहे. 2007 मध्ये कॉफी विथ करण मध्ये दिग्दर्शक आणि कोरिय़ोग्राफर फराह खानने हा खुलासा केला होता.

आतिश: फील द फायर या चित्रपटातील गाण्याच्या सीक्वेन्सदरम्यान रवीना आणि करिश्मामध्ये भांडण सुरू झाले. दोन्ही अभिनेत्री केसांच्या विगने एकमेकांना मारहाण करत होत्या. फराह खान म्हणाली की, हे भांडण एकाच व्यक्तीमुळे झाले होते. करिश्मा आणि रविना दोघी एकाच व्यक्तीला पसंत करत होत्या. ती व्यक्ती म्हणजे अजय देवगण होय.

असे म्हटले जाते की, बॉलीवूड अभिनेता अजय देवगन रविना टंडनबरोबर रिलेशनमध्ये असून देखील तो करिश्मा कपूरबरोबर देखील स्ट्रॉंग बॉंड शेअर करत होता.

Raveena Tandon- Karishma Kapoor
Irshalwadi Landslide : महाराष्ट्रात घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेतल्या बळींच्या मदतीला गायिका अनुराधा पौडवाल धावल्या...

करिश्माने रवीनाला चार चित्रपटांमधून काढले!

या भांडणानंतर रवीना टंडनने एक मुलाखत दिली. जिथे त्याने करिश्मा कपूरचे नाव न घेता अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. रवीना म्हणाली की, करिश्माने तिला चार चित्रपटांमधून काढून टाकले कारण तिचे दिग्दर्शकाशी चांगले संबंध होते.

याबरोबरच रवीना टंडननेही करिश्माचे नाव न घेता तिला गर्विष्ठ म्हटले होते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने करिश्माबद्दल बोलताना सांगितले होते की त्या पब्लिकली भेटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com