Ratna Pathak Shah: तुम्ही पण याच लाइनमध्ये येणार आहात, थोडं थांबा! असं का म्हणाल्या रत्ना पाठक शाह?

Ratna Pathak Shah: आधीपेक्षा आता या वयात जास्त यश मिळते.
Ratna Pathak Shah
Ratna Pathak ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Ratna Pathak Shah: बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींमध्ये रत्ना पाठक शाह यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. रत्ना पाठक शाह वेगवेगळ्या माध्यमातून आणि नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या दमदार अभिनयामुळे रत्ना पाठक यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या व्यक्त होतात तसेच त्यांच्या चाहत्याबरोबर काही गोष्टी शेअर करताना दिसत असतात.

रत्ना पाठक शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी अॅक्टींग आणि स्कीन प्रेसेन्सबाबत आपले मत मांडले आहे. वयावरुन कोणाच्याही अॅक्टींगला जज करु नये असे म्हटले आहे.

66 वर्षीय रत्ना पाठक म्हणतात, त्यांना आधीपेक्षा आता या वयात जास्त यश मिळते. सुरुवातीला त्यांच्याही वय आणि काम यांच्याबद्दल चूकीच्या धारणा होत्या. तुमचं दिसण महत्वाच असतं असं सुरुवातीच्या काळात त्यांना वाटायचे मात्र त्या म्हणतात मी आजूबाजूला पाहिलं कितीतरी अशा अभिनेत्री आपल्या म्हातारपणीदेखील चांगले काम करत आहेत. त्यावेळी वय, काम आणि दिसणं याबाबतचे संभ्रम नष्ट झाले.

आलेल्या अनुभवानंतर रत्ना पाठक म्हणतात, जोपर्यत तुम्ही अभिनय करण्यास सक्षम आहात तोपर्यत तुम्ही तुमच्या दिसण्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण दिसणारे सौंदर्य नष्ट होऊन जाते परंतु तुम्ही काम कसे करता हे महत्वाचे ठरते.

Ratna Pathak Shah
Shahrukh Khan On Chaiyya chaiyya song: व्हाइट हाऊस, छैय्या छेय्या अन् मोदी! चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचे हटके उत्तर

दरम्यान, रत्ना पाठक यांनी अॅक्टींगपेक्षा सौंदर्याला महत्व देणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. त्या म्हणतात, मी एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असेत तर तेथील सेटवरील तरुण अभिनेत्रींवर दया येते कारण त्या सुंदर दिसत नाहीत म्हणून नाराज होतात. मात्र मला माझ्या वाढत्या वयासोबत मी कशी दिसते याची आता चिंता राहिली नसल्याचे म्हटले आहे.

Ratna Pathak Shah
Ratna Pathak ShahDainik Gomantak

जर त्यांना कोणी बिचारी, वय झालेली किंवा म्हातारी म्हणते तेव्हा त्या अशा लोकांना काय उत्तर देतात असा प्रश्न विचारल्यावर रत्ना पाठक म्हणतात- थांबा, थोडे थांबा! तुम्हाला पण याच लाइनमध्ये यायचे आहे. रत्ना पाठक आपल्या दमदार अभिनयाबरोबरच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील प्रसिद्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com