Ratna Pathak on Pathan's Controversy : लोकांच्या ताटात पुरेसं अन्न नाही आणि तुम्ही..'बेशरम रंग' च्या वादावर भडकल्या रत्ना पाठक

सध्या पठाण चित्रपटाचा जोरदार वाद सुरू आहे. यावर अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी राग व्यक्त केला आहे.
Pathan Controversy
Pathan ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दिपीका पदुकोण ( Deepika Padukone) यांची मुख्य भूमीका असलेला पठाण हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चित्रपटातल्या बेशरम रंग या गाण्यात दिपीकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही काही संघटनांनी केली आहे.

या वादावर आता अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची पत्नी अभिनेत्री रत्ना पाठक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या "मी त्या वेळाची वाट बघत आहे जेव्हा लोक द्वेषाला कंटाळतील. जर आपल्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा असेल तर मी म्हणेन कि आपण खुप वाईट काळातुन जात आहोत"

पुढे त्या म्हणाल्या "हे इतकं महत्त्वाचं नाही, ज्याला मी खुप महत्त्व देऊ शकेन किंवा यावर मी खुप काही बोलु शकेन पण मला आशा आहे कि लोक समजुदार बनतील. लोक द्वेषाला कंटाळतील, कारण माणुस जास्त काळ द्वेष सहन नाही करत शकत मी त्या दिवसाची वाट बघत आहे ज्या दिवशी सगळे द्वेषाने थकुन जाल"

Pathan Controversy
Avatar 2 Box Office Collection: 'अवतार 2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कलेक्शन

रत्ना पाठक यांच्या मते अलिकडच्या काळात इंडस्ट्रीमध्ये दर्जेदार काही चाललं आहे असं नाही. एक चित्रपट बनवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते, असा चित्रपट नावाजला जातो.

त्या म्हणतात हे वेळ वाया घालवणं आहे. आपल्याकडचे सगळे मुद्दे संपलेत की काय? आपण आपल्या देशाकडे बघा, कोराेना महामारीने देशातले सगळे छोटे उद्योग बंद पडलेत, लोकांच्या ताटात पुरेसं अन्न नाही आणि आपण कुणी कुठले कपडे घातलेत हे बघत बसलोय"

अभिनेत्री रत्ना पाठक या आपलं मत बेधडक मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याही वेळी त्यांनी आपलं मत थेटपणे व्यक्त केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com