MTV Roadies: रनविजय सिंगचा रोडीजला अलविदा; 'या' अभिनेत्याची होणार एन्ट्री

गेल्या 18 वर्षांपासून एमटीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो रोडीजचा भाग असलेला रणविजय सिंघ आता शोला अलविदा म्हणणार आहे.
Roadies
RoadiesDainik Gomantak

गेल्या 18 वर्षांपासून एमटीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो (Reality show) रोडीजचा (Roadies) भाग असलेला रणविजय सिंघ (Ranvijay Singh) आता शोला अलविदा म्हणणार आहे. त्याच्या जागी बॉलिवूडच्या (Bollywood) एका लोकप्रिय चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. शोमधील रणविजयची जागा कोण घेणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Roadies
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कारकीर्दीतील 'ही' सर्वात कठीण भूमिका

याबाबत निर्माते लवकरच एक निवेदन जारी करणार आहेत. रणविजयची जागा घेणारे काही बॉलिवूड कलाकार आहेत. आता तो अभिनेता कोण, निर्मात्यांना त्याची माहिती गुप्त ठेवायची आहे. लोकांचा मसिहा बनलेला सोनू सूद रणविजयची जागा घेणार असल्याचा दावा केला जात आहे.

रणविजयचा एमटीव्ही रोडीजशी दीर्घकाळ संबंध राहीला आहे. एकेकाळी या शोचा स्पर्धक असलेला रणविजय नंतर होस्ट आणि गँग लीडर बनला. 2003 मध्ये, रणविजय या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

Roadies
रमेश देव यांनी बीग बी-राजेश खन्नांसोबत केले काम

तेव्हापासून रणविजय एमटीव्ही रोडीजचा मोठा चेहरा बनला आहे. शोच्या पहिल्या सीझनमध्ये रणविजय दिसला होता. यानंतर, त्याने रोडीज 2.0 ते रोडीज रिव्होल्यूशनपर्यंतचे सर्व सीझन होस्ट केले आहेत. रोडीज व्यतिरिक्त रणविजयने MTV चे इतर शो देखील होस्ट केले आहेत.

रणविजयने या शोला अलविदा केल्यामुळे चाहत्यांना तो मोठा धक्का बसला आहे. वर्क फ्रंटवर, टीव्ही होस्ट रणविजय सिंघा सध्या वाइल्डलाइफ (Wildlife) शो सफारी इंडियामध्ये व्यस्त आहे. हा शो देशभरातील राष्ट्रीय उद्यानांचे अन्वेषण करतो. रणविजय या शोशी जोडला गेल्याने खूप खूश आहे.

अभिनेत्याने याला त्याचा थरारक अनुभव म्हटले आहे. रोडीजमध्ये सोनू सूदला मेंटॉरच्या भूमिकेत पाहणे खरोखरच मजेशीर असणार आहे. चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com