नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कारकीर्दीतील 'ही' सर्वात कठीण भूमिका

नवाजुद्दीनला त्याच्या व्यक्तिरेखेसाठी खूप प्रशंसा मिळली पण हे पात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण पात्र होते. अखेर कोणती आहे ही भूमिका
Actor Nawazzudin Siddiqui
Actor Nawazzudin Siddiqui Dainik Gomantak
Published on
Updated on

नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazzudin Siddiqui) त्यांच्या कारकीर्दीत मोठ्या पडद्यावर एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रत्येक पात्राशी संबंधित एक डायलॉग नवाज प्रेक्षकांच्या मनात नेहमीच राहतात. त्याचप्रमाणे नवाजुद्दीनने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से नेटफ्लिक्सवर कथन केले आहेत. नेटफ्लिक्सने (Netflix) या व्हिडिओमध्ये (Video) नवाजुद्दीन यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये आणि किस्से दाखवले आहेत. यासोबतच नवाज यांनी त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात कठीण भूमिकेबद्दल सांगितले आहे. अखेर कोणती होती ती भूमिका जाणून घेऊया

नवजुद्दीच्या (Nawazzudin Siddiqui) कारकीर्दीमधील सर्वात कठीण चित्रपट "ठाकरे" हा होता. बाळ ठाकरेंची (Bal Thackeray) भूमिका साकारणे नवाजसाठी खूप अवघड होते, असे नवाजने नेटफ्लिक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. नवाज म्हणाले- माझ्या कारकीर्दीतील सर्वात कठीण भूमिका ठाकरेंची होती, ती भूमिका कठीण होती कारण मला ठाकरेंची कॉपी करायची नव्हती, मला वाटले की मी त्यांचे विचार धरावे, ते भाषण करायचे तेव्हा हात वर करून बोलायचे, मी त्यांच्याबद्दलची सर्व माहिती करून घेतली होती.

Actor Nawazzudin Siddiqui
Actor Nawazzudin SiddiquiDainik Gomantak
Actor Nawazzudin Siddiqui
रमेश देव यांनी बीग बी-राजेश खन्नांसोबत केले काम

तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिकेतील बारकावे लक्षात आलेच असतील. त्यांनी आपल्या अभिनयाने त्यांनी बॉलीवुडमध्ये (Bollywood) आपली ओळख बनवली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये (Video) नवाज यांनी त्यांच्या प्रवासावर एक कविताही तयार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com