VIDEO: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष बघताहेत Dhurandhar 2 ची वाट! पहिला भाग आवडल्याची दिली माहिती; चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

Finland president watched dhurandhar: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी भारताच्या दौऱ्यापूर्वी भारतीय चित्रपट पाहिल्याची माहिती दिली आहे.
finland president watched dhurandhar
finland president watched dhurandharDainik Gomantak
Published on
Updated on

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी भारताच्या दौऱ्यापूर्वी भारतीय चित्रपट पाहिल्याची माहिती दिली आहे. ४ ते ७ मार्च २०२६ दरम्यान भारत भेटीवर आलेल्या स्टब यांनी भारतात येण्यापूर्वी रणवीर सिंग अभिनित ‘धुरंधर’ हा गुप्तहेर कथानकावर आधारित चित्रपट पाहिल्याचे सांगितले.

भारत दौऱ्यात त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्टब यांनी सांगितले की, भारतात येण्यापूर्वी त्यांच्या मुलाने त्यांना ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्यातील कथानक रोचक वाटल्याचे त्यांनी नमूद केले.

दहशतवादाविरोधातील संघर्षाचा विषय चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच १९ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दलही ते उत्सुक असल्याचे त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

finland president watched dhurandhar
Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक... ! 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, हमजा अली अब्बासीच्या क्रूर लूकने वेधलं लक्ष VIDEO

आता त्याचा पुढील भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग यांच्यासह संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जवळपास चार तासांच्या कालावधीचा हा चित्रपट अलीकडील हिंदी चित्रपटांपैकी प्रदीर्घ मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brazil President Lula Slams Donald Trump
Goa Open Market Borrowing
 Goa Marathi Film Festival 2026
Telegram 15 Day Goverment Ultimatum
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com