Ranveer Singh On Don 3: डॉन 3 मध्ये शाहरुखऐवजी रणवीर सिंहला पाहून रंगलेल्या चर्चांवर आता अभिनेत्याने सोशल मिडियावर स्वत:च पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे.
फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन मध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान दिसणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र रणवीर सिंहला पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनची जागा तू कधीही घेऊ शकत नाहीस असे म्हणत रणवीर सिंहला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
काय म्हणाला रणवीर?
आता रणवीरने या सगळ्याला उत्तर म्हणून सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो- 'आपल्या सगळ्याप्रमाणेच मीदेखील माझ्या लहानपणीच चित्रपटांच्या प्रेमात पडलो. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचे चित्रपट बघत मी मोठा झालो आहे.
महत्वाचे म्हणजे, हिंदी चित्रपटात मी काम करायचे ठरवले त्याला हे दोन अभिनेते कारणीभूत आहेत. त्यांच्यासारखेच बनण्याचे स्वप्न मी मोठे होताना पाहिले आहे. माझा आयुष्यावर असेलला त्यांचा प्रभाव आणि परिणाम कधीही कमी होऊ शकत नाही.
मी ज्या प्रकारचा माणूस आणि अभिनेता तो त्यांचा प्रभावाचा परिणाम आहे. डॉन ची परंपरा पुढे चालवणे हे माझ्या लहानपणीचे स्वप्न असल्याचेदेखील रणवीर सिंगने म्हटले आहे.
डॉन परंपरेचा भाग बनणे ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या अनेक पात्रांवर जसे तुम्ही प्रेम केले तसे या डॉनमध्ये पाहिल्यावरही कराल, तो चान्स तुम्ही मला द्याल असे त्याने चाहत्यांना उद्देशून लिहले आहे.
फरहान आणि रितेशने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. मी आशा करत आहे की, मी तुमच्या विश्वासास मी पात्र ठरेन. याबरोबरच बिग बी आणि शाहरुख खानला माझ्यावर गर्व वाटण्याची संधी देईन. मी माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच पूर्ण प्रयत्न करेन असेही रणवीर सिंगने म्हटले आहे.
शाहरुखच्या जागी रणवीरला पाहून अनेकांनी त्याला तू या दिग्गज अभिनेत्यांची जागा घेऊ शकत नाहीस असे म्हटले होते, त्यावर रणवीरने हे उत्तर दिले आहे. काहींनी त्याला ट्रोल केले असले तरीही काहींनी त्याचे कौतुकदेखील केले आहे.
आता रणवीर आपले शब्द कृतीत उतरवणार का? अमिताभ आणि शाहरुखची परंपरा पुढे चालवणार का? प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता डॉन 3 बद्दल प्रेक्षकांच्या मनात रणवीर सिंगला पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.