Mrs Chatterjee Vs Norway : आपल्या मुलांना गमावलेल्या आईची गोष्ट, राणी मुखर्जीचा नवा चित्रपट नेमका काय आहे?

अभिनेत्री राणी मुखर्जीचा नवा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे
Rani Mukerji
Rani Mukerji Dainik Gomantak
Published on
Updated on

राणी मुखर्जी हे नाव भारतीय चित्रपटांतली एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणूनच घेतलं जातं. राणी मुखर्जी प्रेक्षकांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली राणी मुखर्जी लवकरच मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही समोर आला आहे.

 या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया राणी मुखर्जीच्या या चित्रपटात काय खास पाहायला मिळणार आहे आणि चित्रपट कधी रिलीज हो

या चित्रपटाची कथा खऱ्या घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. राणी मुखर्जीचा चित्रपट सर्व प्रतिकूलतेशी लढून आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी एका देशाला आव्हान देण्याची स्त्रीची गोष्ट सांगतो. 

राणी मुखर्जीचा उत्कृष्ट अभिनय, कथानक आणि आई आणि मूल यांच्यातील अद्भुत नातं या चित्रपटात पाहायला मिळेल चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना गुंतवुन ठेवेल हे निश्चित. हा चित्रपट साहजिकच प्रेमकथा नाही आणि यात रोमान्सही नाही या चित्रपटात उत्कृष्ट पात्र आहेत जी तुम्ही संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता.

Rani Mukerji
Ram Charan : अभिनेता रामचरणच्या बायकोचा बदला.. नवऱ्याला दिली अशी शिक्षा, व्हिडीओ बघाच

चाहत्यांच्या प्रतिसादाबद्दल सांगायचे तर या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीज होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

चित्रपटाचे संवाद उत्कृष्ट आहेत. ट्रेलरमध्ये राणी मुखर्जी म्हणते,  "हम अच्छा मां है, बुरी मां है, पता नहीं लेकिन हम मां हैं" या चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलरमधुन हे स्पष्ट दिसतं की राणी मुखर्जी एक शानदार पुनरागमन करणार आहे. या चित्रपटांत तिच्या अभिनयाचा वेगळेपणा प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com