चप्पल घालून देवीचं दर्शन घेणारी राणी मुखर्जी नेटीजन्सकडून ट्रोल... व्हिडीओ व्हायरल

चप्पल घालून देवीचं दर्शन घेणारी राणी मुखर्जी नेटीजन्सकडून ट्रोल... व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री राणी मुखर्जीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on

Rani Mukerjee Viral Video : आपल्या कसदार अभिनयाने नटलेल्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बॉलीवूडच्या मर्दीनीची अर्थात राणी मुखर्जीची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे.

इतरवेळी आपल्या चित्रपटातून चर्चेत असणारी राणी मुखर्जी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. राणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यावरुन नेटीजन्सनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

सेलिब्रिटी देवीच्या उत्सवात तल्लीन

सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव पहायला मिळत आहे. यानिमित्त बॉलिवूड स्टार्सही दुर्गा देवीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.

बॉलीवूडचे सर्व स्टार्सनी दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावली. यावेळी राणी मुखर्जी, कियारा अडवाणी, सुष्मिता सेन, हेमा मालिनी, ईशा देओल, इशिता दत्ता, सुमोना चक्रवर्ती, तनिषा मुखर्जी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी उपस्थिती लावली.

राणी नटून थटून देवीच्या दर्शनाला

यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जीदेखील या कार्यक्रमात दिसली. राणी मुखर्जीने दुर्गापूजेसाठी सोनेरी रंगाची साडी नेसली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

न्यूड मेकअपसह राणीने तिचा लूक पुर्ण केला होता. मात्र यावेळी राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत राणी दुर्गा देवीचा आशीर्वाद घेताना दिसली मात्र यावेळी तिच्याकडून खुप मोठी चुक झाली. ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

देवीच्या मंडपात चप्पल घालून

देवीच्या मंडपात राणी ही चप्पल घालून स्टेजवर देवीचा आशिर्वाद घेताना दिसली. राणीने मंडपात चप्पल घालून देवी जवळ गेली. त्याचबरोबर ती या व्हिडिओत देवीचा फोटो काढताना देखील दिसली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नेटीजन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओनंतर राणीवर नेटकऱ्यांनी हल्लाच केला आहे. तिला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. राणी फक्त देवीची भक्त असल्याचा दिखावा करत आहे.

'चप्पल तरी काढायची, 'तू देवीपेक्षा महान नाहीस', 'चप्पल घालून देवाच्या इतक्या जवळ गेलीय कशी राणी' , 'ही भक्ती नाही, फॅशन शो आहे'., 'दुर्गा माँच्या मंचावर चप्पल?', अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहे.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com