Bigg Boss OTT मध्ये होणार रणबीर-करीनाची धमाकेदार एन्ट्री

करण जोहरच्या (Karan Johar) या उत्तराने चाहते( Fans) खूप उत्साहित झाले आहेत.
Karan Johar
Karan JoharInstagram/@karanjohar
Published on
Updated on

'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या रिअॅलिटी (Reality) शोची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोण कोण सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) स्पर्धकांची (Competitor) संपूर्ण यादी अजूनही जाहीर करण्यात आली नाही. परंतु या दरम्यान करण जोहरला (Karan Johar) विचारण्यात आले की, बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तुमच्या मित्रांपैकी (Friends) सर्वोत्तम कोण असेल, तेव्हा करणने दिलेल्या उत्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

करण जोहरने (Karan Johar) या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले, ' दोन लोक असे आहेत जे ओवर द टॉप आहेत. ते म्हणजे रणबीर कपूर आणि करीना. दोघांच्या स्वभावात खूप साम्य आहे. त्यांना या शो मध्ये पाहायला खूप मज्जा येणार आहे. करण जोहरच्या या उत्तराने चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

Karan Johar
प्रसिद्ध अभिनेत्रीने पास केली CBSE परिक्षा; जाणून घ्या किती टक्के गुण मिळाले?

* बिग बॉस ओटीटीमध्ये होणार खूप ड्रामा

करण जोहर पुढे म्हणाला , मी सर्व स्पर्धकांना भटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत छान आठवणी तयार करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. तुमचा यावर विश्वास आहे किंवा नाही, पण बिग बॉस ओटीटीमध्ये खूप ड्रामा होणार आहे. तसेच हा शो ओवर द टॉप होणार आहे, असे मी सांगू शकतो.

Karan Johar
Kangana Ranaut: पाहा परदेशातील ग्लॅमरस लुक

* बिग बॉस वूटवर पाहू शकता

या नंतर करण शेवटी म्हणाला, 'चाहत्यांना या वेळी एक अनोखा अनुभव मिळेल. ते घरात घडणाऱ्या दैनंदीन ड्रामाबरोबर थेट आणि सखोलपणे जोडू शकणार आहेत आणि त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. प्रेक्षकांना (Audience) शोमधील काही उत्कृष्ट कालाकारांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बिग बॉस ओटीटी 8 ऑगस्टपासून वूट अॅपवर (Voot App) पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com