Arun GowilDainik Gomantak
मनोरंजन
प्रभू श्रीरामचंद्राची अजरामर भूमीका साकारणारे अरुण गोविल यांचा सेटवर अपघात
अभिनेते अरुण गोविल यांचा सेटवर अपघात झाल्याने ते जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Arun Gowil Injured : प्रभूश्रीरामचंद्राची अजरामर भूमीका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपली सात्विक छाप निर्माण करणारे अभिनेते अरुण गोविल यांच्यासंदर्भातील एक वाईट बातमी समोर आली आहे. एका चित्रपटाच्या सेटवर जीपची धडक बसल्याने ते जखमी झाले आहेत
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या अरुण गोविल यांना दुखापत झाली आहे. अरुण गोविल नुकतेच त्याच्या 'नोटिस' या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्याचवेळी तो जखमी झाला.
अरुण गोविल यांची प्रकृती सध्या बरी आहे. पण शूटिंगदरम्यान त्याला खूप वेदना होत होत्या. अपघाताचे वृत्त त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच वेदनादायी आहे. यासंदर्भातल्या अपडेट्स आम्ही देत राहू.