Dipika Chikhlia: रामायण मालिकेच्या शूटिंगआधी मी रामनामाचा जप करत असायचे; दिपिका यांनी शेअर केले अनुभव

Dipika Chikhlia: असे वाटत होते की मी त्यांची मुलगी आहे आणि माहेरात माझे स्वागत केले जात आहे.
Arun Govil 
Deepika Chikhalia
Arun Govil Deepika ChikhaliaDainik Gomantak
Published on
Updated on

Dipika Chikhlia: रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपीका चिखलिया पून्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपीका चिखलिया यांनी सीतेच्या भूमिकेत पाहिल्यानंतर जनसामान्य प्रेक्षकांनी त्यांनाच सीता मानयला सुरुवात केल्याच्या अनेक घटना अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सांगितल्या आहेत.

रामायण मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक आठवणी ताज्या करताना दीपीका यांनी काही किस्से एका इंस्टाग्रामच्या व्हिडिओदरम्यान सांगितले आहेत.

या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, जेव्हा मी मिथिलामध्ये गेले होते तेव्हा तेथील लोकांनी माझे भव्य स्वरुपात स्वागत केले त्यांचे प्रेम बघून मी भावूक झाले होते. असे वाटत होते की मी त्यांची मुलगी आहे आणि माहेरात माझे स्वागत केले जात आहे.

जेव्हा मी मुंबईला परतत होते तेव्हा एका ताटात माझ्यासाठी एक साडी आणि शृगांरांचे साहित्य देऊन माझी पाठवणूक केली, जशी एखादी मुलगी आपल्या माहेरातून सासरी परतत असते. हे सगळे पाहून माझे डोळे भरुन आले होते. हे सगळे निरागस लोक आहेत ज्यांना वाटते की मीच सीता आहे आणि ते त्यांच्या मुलीची पाठवणूक करत आहेत. असे वाटत होते की, सीतामाता घरी परतली आहे.

सीतेच्या भूमिकेविषयी बोलताना दीपीका चिखलिया म्हणतात, रामायण मालिकेच्या शूटिंगच्या आधी मी रामाच्या नावाचा जप करत असायचे. जर तुम्ही माझा चेहरा नीट पाहिलात तर माझ्या चेहऱ्यावर तो भक्तीभाव दिसतो. आणि माझ्याकडूनदेखील धार्मिक मालिकांमध्ये भूमिका निभावते येते.

बाकीच्या अभिनेत्रींचा विचार केला असता त्या फक्त अभिनय करतात परंतु माझ्यासाठी ती भक्तीभावाची गोष्ट आहे. त्या काळात आम्ही मेकअपदेखील कमी करत असायचो. आताच्या अभिनेत्री ज्या सीतेची भूमिका निभावतात त्या निशंकपणे खूप सुंदर आहेत मात्र त्या सीता बनू शकत नाहीत. त्यांच्यात सीतेचा ग्रेस मिसिंग आहे असेही दिपीका यांनी म्हटले आहे.

Arun Govil 
Deepika Chikhalia
Babul Bihari Arrested: विकृतीचा कळस, या गायकाने केलं अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

आम्ही ज्यावेळी रामायण मालिकेचे शूटिंग केले होते त्यावेळी कमी साधनांमध्ये आमचे काम होत असे. एखादे पात्र निभावण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेत असू. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सीतेची भूमिका करताना खूप काळजी घ्यावी लागत असे मात्र त्यानंतर सवय होत गेली आणि त्यात सुधारणादेखील होत गेली.

जेव्हा आऊटडोअर शूटिंग असे त्यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असे. खासकरुन वॉशरुमचा प्रॉब्लेम असायचा. काहीवेळा आम्ही कारच्यामध्ये साडी नेसली आहे. अशा प्रकारे दीपीका चिखलिया यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com