राखीला तूर्तास अटकेपासून दिलासा...कोर्टाने नेमकं काय सांगितलं?

अभिनेत्री ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या चर्चेत आहे ती तिच्या अटकेच्या शक्यतेच्या वृत्ताने.
Rakhi Sawant
Rakhi Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

राखी सावंतला सध्या अटकेपासून दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील एका न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंतला तिच्या विभक्त पतीने दाखल केलेल्या खटल्यात 7 डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

 राखी सावंतचा पती आदिल दुर्रानी यांनी राखीविरुद्ध त्यांचे वैयक्तिक व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार दिंडोशी सत्र न्यायालयाने राखी सावंतला तात्पुरता दिलासा दिला असून, आदिल दुर्राणीने तिच्या अटकपूर्व जामीन याचिकेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
राखीला दिलासा देताना न्यायालयाने म्हटले आहे की, अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी तिच्या पतीच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येत असल्याने तिला तिचे म्हणणे मांडण्याची संधी देता येईल, त्यामुळे तिला सुरक्षा प्रदान करणे योग्य ठरेल.

न्यायालयाचे आदेश

राखीवर ७ डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. दुर्राणी यांच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी सावंत यांच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Rakhi Sawant
म्हणून राणी मुलगी आदिराला लाइमलाइट पासून दूर ठेवते...

राखीने आपली बदनामी करण्यासाठी अनेक ठिकाणी त्याचे वैयक्तिक व्हिडिओ दाखवल्याचा आरोप दुर्रानीने केला आहे. राखीचे वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले की, आदिलचा एकमेव उद्देश अभिनेत्रीला त्रास देणे आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com