Lal Salam : लाल सलामचे पोस्टर रिलीज..जेलरनंतर रजनीकांत दिसणार या नव्या भूमीकेत

अभिनेता रजनीकांतच्या जेलरनंतर आता लाल सलामची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Lal Salam''s new Poster
Lal Salam''s new Poster Dainik Gomantak

Rajnikanth's Lal Salam Poster Release : 2023 साली मनोरंजन विश्वात ज्या चित्रपटांची चर्चा आहे त्या चित्रपटांमध्ये थलैवा अर्थात रजनीकांतच्या जेलरचं नाव घ्यावं लागेल.

या चित्रपटातल्या रजनीकांतच्या अभिनयाची चर्चा तर झालीच शिवाय साऊथची ब्युटी क्वीन तमन्नाच्या कावला गाण्याची जोरदार चर्चा झाली.

या दिवशी रिलीज होणार चित्रपट

यापूर्वी जुलैमध्ये रजनीकांत यांनी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित लाल सलाम या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. 

आता, आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करणारे एक नवीन पोस्टर बाहेर आले आहे. 

रजनीकांत यांची मुख्य भूमीका

निर्मात्यांनी रविवारी जाहीर केले की, रजनीकांत यांची मुख्य भूमीका असणारा हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये पोंगल सणाच्या वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल.

या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत आणि कपिल देवचा कॅमिओ देखील आहे

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

"लाल सलाम पोंगल 2024 ला पडद्यावर येणार," निर्मात्यांनी 1 ऑक्टोबरला रिलीजची तारीख न सांगता ट्विट केले. नवीन पोस्टरमध्ये लाल रंगाचा पॅलेट असुन यात अभिनेते रजनीकांत दिसतात.

त्यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने ट्विट केले की, या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहीन. दुसर्‍याने लिहिले, “आता आणखी काही रजनीकांत ब्लॉकबस्टरसाठी काही महिने बाकी आहेत.”

Lal Salam''s new Poster
अभिनेत्याच्या कारच्या धडकेत महिलेला जागीच मृत्यू

चित्रपटाबद्दल

ऑक्टोबर 2022 मध्ये, ऐश्वर्या रजनीकांत मुख्य भूमिकेत अथर्व आणि रजनीकांत छोट्या भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची अफवा होती. 

2022 च्या नोव्हेंबरमध्ये, ऐश्वर्याने, सोशल मीडियाद्वारे, लाल सलाम या तिच्या पुढील दिग्दर्शनाची घोषणा केली, ज्यात विष्णू विशाल एक क्रिकेटर आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. 

चेन्नईमध्ये मार्च 2023 मध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली, तर डिसेंबर 2022 मध्ये एक मुहूर्त पूजा आयोजित करण्यात आली होती. टीमने ऑगस्टमध्ये शूटिंग पूर्ण केले असुन आता चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com